आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर भडकली इलियाना, मिडल फिंगर दाखवून व्यक्त केला राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूज प्रग्नेंट असल्याची बातमी काही दिवसांपुर्वी आली होती. याच काळात तिचा बॉयफ्रेंड एंड्यू नीबोनने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये इलियानाने ब्लॅक टी-शर्ट घातला आहे आणि ती sauce बॉटलने आपला चेहरा लपवत प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर मिडल फिंगर दाखवून राग व्यक्त करत आहे. गेल्यावर्षी क्रिसमसच्या काळात इलियाना आपल्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती. क्रिसमसच्या निमित्ताने तिने एक फोटो शेअर केला होता आणि बॉयफ्रेंड एंड्यूला हबी लिहिले होते. यानंतर बोलले जात होते की, इलियानाने गुपचूप लग्न केलेय.


इलियानाने लग्नाची गोष्ट कधीच मान्य केली नाही

- काही काळापुर्वी एका मुलाखतीत इलियानाने एंड्यूविषयी विचारलेल्या प्रश्नावर म्हटले होते की, 'जे आहे ते सर्वांसमोर आहे. मी लोकांना जेवढे सांगायला हवे तेवढेच सांगेल.'
- इलियानाने तिने क्रिसमसच्या निमित्ताने शेअर केलेला फोटो आणि एंड्यूला हबी लिहिले याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ती म्हणाली की, 'सोशल मीडियाची एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोकांना तुमच्याविषयी माहिती मिळते. मला जितके शेअर करायचे होते ते मी केले. एंड्यूसोबतचे माझे नाते पर्सनल आहे. मी याविषयी सांगणार नाही.'

- इलियानाचा 'रेड' हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. चित्रपटात इलियाने अजय देवगनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 96 कोटी रुपयांची कमाई केली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इलियानाचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...