आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पाटणीच्या शालेय वयातील फोटोला वेब पोर्टलने म्हटले \'कुरुप\', तिने असे दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिशा पाटनी लवकरच आगामी सिनेमा 'बागी-2' मधून झळकणार आहे. या चित्रपटात बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत झळकणार आहे. नुकताच दिशाचा शाळेच्या दिवसातील एक फोटो समोर आला आहे. हा दिशाचा सातवी वर्गात असतानाचा फोटो आहे ज्यात ती तिच्या क्लासमेट्ससोबत दिसत आहे. फोटोवरुन एका न्यूज पोर्टलवर भडकली दिशा..

 

- दिशाच्या शाळेच्या दिवसातील या फोटोबद्दल न्यूज पोर्टलने लिहीले की कधीकाळी इतकी कुरुप दिसायची दिशा पाटनी..
- दिशाने या फोटोवरील बातमीवरुन लिहीले की, हो बरोबर आहे, मी एक सुंदर गाऊन घालायला हवा होता आणि मेकअप आणि छान हेअरस्टाईल करुन सातवीत असताना शाळेत जायला पाहिजे होते तेव्हा तुम्हाला एखादी छान हेडलाईन मिळाली असती. त्यानंतर तिने टोमणा मारत याच्याहून चांगली बातमी तुम्हाला मिळाली नाही का असेही लिहीले.
- दिशाने आतापर्यंत केवळ दोन चित्रपटात काम केले आहे आणि  तरीही तिची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात आहे.

 

दिशाने फॅशन इंडस्ट्रीतही केले काम..
- बरेलीमध्ये जन्मलेल्या दिशा 2013 साली 'फेमिना मिस इंडिया इंदौर'ची रनरअपही होती. 
- दिशा लहानपणापासून अभ्यासात खूप चांगली होती आणि कधीकाळी वैज्ञानिक होण्याचे स्वप्नही पाहत होती. पण नशीबाने वेगळेच ठरवत दिशा चित्रपटांत आली.
- 2011 साली लखनऊ येथे एमिटी यूनिवर्सिटीमध्ये बायोटेकचे शिक्षण घेत असताना तिने फॅशन फिल्डमध्ये नशीब आजमावले.
- 2015 साली दिशाने तेलुगु फिल्म 'लोफर'मधून डेब्यू केला. त्यानंतर तिने 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'(2016), 'बेफिक्रा'अल्बममध्येही ती दिसली होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, दिशा पाटनीचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...