आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री आणि टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटणी अलीकडेच मुंबईत एका क्लिनिकच्या उदघाटनासाठी पोहोचली होती. यावेळी ती लाइट ब्राउन कलरच्या बॉडी फिट ड्रेसमध्ये स्टनिंग गिसली. पण याचवेळी तिच्या पाठीवर मोठमोठ्या खुणादेखील बगायला मिळाल्या. या विशिष्ट खुणा एका ब्युटी ट्रीटमेंटमुळे शरीरावर पडत असतात. या ट्रीटमेंटला कपिंग थेरपी असे म्हटले जाते. याच्या माध्यमातून स्किन सुंदर आणि तजेलदार दिसते. ही एक चायनीज रिलॅक्सेशन थेरपी आहे.
काय आहे कपिंग थेरपी...
ही एक चायनीज रिलॅक्सेशन थेरपी आहे. या थेरपीत अतिशय वेदना होतात. या ट्रिटमेंटच्या माध्यमातून शरीराच्या आतील घाण बाहेर काढली जाते आणि स्किन टिश्यूला ऑक्सिजनच्या मदतीने खोलवर आराम दिला जातो. ही एक वेदनादायी थेरपी आहे. यामध्ये अॅक्यूपंचर स्पेशलिस्ट कॉटनचे गोळे दारुत भिजवले जातात. त्यानंतर हे गोळे काचेच्या छोट्या ग्लास किंवा कपात ठेऊन त्याला आग लावली जाते आणि नंतर ती आग विझवून गरम कप किंवा ग्लास शरीरावर ठेवले जाते.
या अभिनेत्रींनी केली आहे कपिंग थेरपी
दिशा खरंच या थेरपीची मदत घेतेय की नाही, या खुलासा अद्याप झालेला नाही. पण यापूर्वी काही अभिनेत्रींनी या ट्रीटमेंटची मदत घेतली आहे.
एक नजर टाकुया, बॉलिवूडमध्ये कुणी केली आहे ही ट्रीटमेंट...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.