आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IITतून पासआउट इंजिनियर आहे हिंदी चित्रपटांमधला हा भूत, आता असा आहे Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 80 च्या दशकात रामसे ब्रदर्सच्या हॉरर चित्रपटांमधील ‘सामरी’ ही व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अनिरुद्ध उर्फ अजय अग्रवाल दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. लांब-लांब दात, लाल डोळे, रक्तरंजित चेह-याने प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवणारे अनिरुद्ध सहा फूट उंच आहेत. एवढी उंचीच हळूहळू त्यांच्यासाठी त्रासदायक ठरु लागली. पाठ आणि कमरेच्या दुखण्यामुळे त्यांनी चित्रपटांपासून सन्यांस घेतला. इतकेच नाही तर त्यांना ऑफर होणा-या भूमिका इतर कलाकारांच्या वाट्याला जाऊ लागल्या. आता चित्रपटांपासून दूर अनिरुद्ध सध्या त्यांचा व्यवसाय सांभाळत आहे. 


100 रुपये घेऊन झाले होते मुंबईत दाखल... 
- अनिरुद्ध यांनी आयआयटी रुडकी येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री प्राप्त केली. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. असे म्हटले जाते, की अनिरुद्ध खिशात केवळ 100 रुपये घेऊन कामाच्या शोधात पहिल्यांदा मुंबईत आले होते.
- 68 वर्षीय अनिरुद्ध यांचा जन्म 1 डिसेंबर, 1949 रोजी देहरादून येथे झाला.  2010 नंतर ते चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसत नाहीत.
- 2010 मध्ये रिलीज झालेला निर्माता-दिग्दर्शक विल्सन लुईस यांच्या 'मल्लिका' या हॉरर चित्रपटात अनिरुद्ध अखेरचे झळकले होते. त्यांनी या चित्रपटात त्यांनी 'सामरी' ही व्यक्तिरेखा वठवली होती.
- चित्रपटात त्यांच्याशिवाय हिमांशु मलिक, सुरेश मेनन, शीना नायर, राजेश खेरा आणि मामिक या कलाकारांनी काम केले होते.


या टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकले अनिरुद्ध
- अनिरुद्ध यांनी बंद दरवाजा, पुराना मंदिर, बँडिट क्वीन, सामरी, आज का अर्जुन, जादूगर, मर मिटेंगे, राम लखन, मेला, तलाश, तुम मेरे हो, बचाओ : इनसाइड भूत है आणि मल्लिका या चित्रपटांमध्ये काम केले.
- तर झी टीव्हीच्या गाजलेल्या 'झी हॉरर शो' आणि 'मानो या ना मानो' या मालिकांमध्ये ते झळकले.
- 'सच अ लाँग जर्नी' या हॉलिवूड आणि रुडयार्ड किपलिंग यांच्या 'द जंगल बुक'मध्ये ते दिसले.


पुढील स्लाईड्सवर 4 PHOTOS मध्ये बघा, सामरी उर्फ अनिरुद्ध अग्रवाल यांचा अंदाज...

बातम्या आणखी आहेत...