आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः अभिनेता रणबीर कपूर स्टारर आगामी 'संजू' या चित्रपटाचा टीजर मंगळवारी रिलीज झाला आहे. संजय दत्तच्या खासगी आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात रणबीरने संजयच्या लकबीपासून ते लूकपर्यंत सर्वकाही अगदी हुबेहुब संजयप्रमाणे कॉपी केले आहे. पडद्यावर रणबीर संजय दत्तच वाटतोय. क्षणभर त्याला बघून हा रणबीर नसून संजय दत्तच आहे, असे वाटले. मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या टीजर लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटला संजय दत्त गैरहजर होता. पण त्याचा एक व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला.
व्हिडिओत हे म्हणाला संजय दत्त...
- संजय दत्त त्याच्या आगामी एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने भारताबाहेर आहे.
- त्याने टीजर लाँचच्या निमित्ताने एक व्हिडिओ मेसेज चित्रपटाच्या निर्मात्यांकडे पाठवला.
- संजयने या व्हिडिओ मेसेजमध्ये म्हणतो, 'माझ्या खासगी आयुष्यावर चित्रपट येतोय, यावर अद्याप माझा विश्वास बसत नाहीये. टीजर लाँचवेळी मी तेथे उपस्थित राहावे, अशी माझी मनापासून इच्छा होती. पण सध्या मी शूटिंगसाठी भारताबाहेर आहे."
- व्हिडिओ मेसेजमध्ये संजय पुढे म्हणतो, 'मी या चित्रपटातील काही सीन्स बघत होतो, तेव्हा रणबीर हुबेहुब माझ्यासारखा दिसतोय, यावर क्षणभर माझा विश्वासच बसला नाही.'
- संजय दत्त शेवटी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना गंमतीने म्हणतो, 'राजू पुढच्या मुन्नाभाईमध्ये माझ्याऐवजी रणबीरला घेऊन नकोस, कळलं का...'
- येत्या 29 जून रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'संजू'मधील रणबीर कपूरच्या लूक्सचे फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.