आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या ऑनस्क्रिन पत्नीने गुपचुप थाटले लग्न, पती आहे टेनिस प्लेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय देवगणसोबत श्रिया सरन, उजवीकडे श्रियाचा पती अँड्री कोसचीव - Divya Marathi
अजय देवगणसोबत श्रिया सरन, उजवीकडे श्रियाचा पती अँड्री कोसचीव

‘दृश्यम’ या गाजलेल्या चित्रपटात अभिनेता अजय देवगणच्या पत्नीची भूमिका वठवणारी अभिनेत्री श्रिया सरनने प्रियकर अँड्री कोसचीवशी लग्नगाठ बांधली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरलेल्या श्रिया 12 मार्च रोजी रशियन प्रियकर अँड्रीसोबत मुंबईत विवाहबद्ध झाली. मुंबईतील लोखंडवाला इथल्या श्रियाच्या राहत्या घरीच हा लग्नसोहळा पार पडला. हा सोहळा अत्यंत खासगी ठेवण्यात आल्याने दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्र-परिवारच उपस्थित होता. बॉलिवूडमधून लग्नात अभिनेता मनोज बाजपेयी आणि अभिनेत्री शबाना आझमी उपस्थित होत्या.


हिंदू पद्धतीने झाले लग्न... 

- हिंदू पद्धतीने श्रिया आणि अँड्रीचे लग्न लागले.
- मध्यंतरी बातमी आली होती, की श्रिया उदयपूर येथे डेस्टिनेशन वेडिंग करेल. पण काही कारणास्तव तिने मुंबईतच लग्न उरकले.

- अँड्री हा नॅशनल लेव्हलचा टेनिस प्लेअर आहे.

 

ड्वेन ब्रावोसोबत जुळले होते श्रियाचे नाव...
- श्रिया दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. श्रियाचे नाव वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ड्वेन ब्रावोसोबत जुळले होते. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. पण श्रियाने ब्रावोसोबतचे नाते कधीच स्वीकारले नाही.
- चित्रपटांसोबतच अनेक ब्रॅण्डसाठी काम करणारी श्रिया एका फॅशन मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करुन चर्चेत आली होती. हे मॅगझिन जेव्हा मार्केटमध्ये आले होते, तेव्हा कव्हर पेजवर झळकणारी ती मी नव्हेच अशी भूमिका श्रियाने घेतली होती. 
- 2011 मध्ये श्रियाने मुंबईत एक स्पा उघडले असून त्याचे नाव श्री स्पा आहे.  

 

डान्सिंगमध्ये करायचे होते करिअर...
- साऊथ चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या श्रियाचा जन्म डेहराडून येथे झाला होता. तर तिचे बालपण हरिद्वार येथे गेले. बालपणापासूनच श्रियाला नृत्यात रुची होती.
- नृत्यात करिअर करण्याचे स्वप्न श्रियाने पाहिले होते. श्रियाला कॉलेजमध्ये असताना एका गाण्याच्या व्हिडिओत काम करण्याची संधी मिळाली होती.
- हा व्हिडिओ बनारसमध्ये शूट झाला होता. या व्हिडिओनंतर तिला रामोजी फिल्म्सच्या 'इष्टम' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिला चार ते पाच चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...