आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन BF सोबत लग्न करतेय ही अभिनेत्री, या हिरोइन्सचेही होते विदेशी व्यक्तींशी अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगनसोबत काम केलेली श्रिया सरन, मार्च 2018 मध्ये रशियन बॉयफ्रेंडसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. एका प्रसिध्द वेबसाइटच्या रिपोर्ट्सनुसार, दोघांना भेटून जास्त काळ झालेला नाही. परंतू चांगल्या अंडरस्टँटिंगमुळे हे आपले रिलेशन नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाणार आहेत. आलेल्या वृत्तांनुसार श्रिया सध्या रशियामध्ये बॉयफ्रेंडच्या पालकांना भेटण्यासाठी गेली आहे. दोघांचे लग्न राजस्थानमध्ये होऊ शकते. 


- श्रियासोबतच बॉलिवूमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्या विदेशी बॉयफ्रेंडला डेट करत आहेत किंवा त्यांनी विदेशी लाइफ पार्टनर निवडलेले आहेत. यामध्ये इलियाना डिक्रूज, प्रिती झिंटा, श्रुति हासन, सेलिना जेटली, किम शर्मा, सुचित्रा पिल्लईसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.


इलियाना डिक्रूज आणि इंड्यू नीबोन
इलियाना डिक्रूज ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड एंड्यू नीबोनसोबतचे फोटोज अनेक वेळा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही महिन्यांपुर्वी तिने इंड्यूला KISS करतानाचा फोटो शेअर केला होता. इलियाना मागच्या 4 वर्षांपासून नीबोनला डेट करतेय आणि आपले प्रेम व्यक्त करण्यात तिने कधीच संकोच केला नाही. अनेक वेळा बातम्या आल्या होत्या की, इलियाना आणि नीबोनने ऑस्ट्रेलियामध्ये गुपचुप पध्दतीने लग्न केले आणि दोघंही हे सीक्रेट ठेवत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन अशाच काही अभिनेत्रीविषयी जाणुन घ्या ज्यांचे विदेशी लोकांसोबत अफेअर होते...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...