आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: एकेकाळी ट्विंकलच्या प्रेमात वेडा होता करण, गे असल्याचा स्वतः केला होता खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि कॉश्च्युम डिझायनर करण जोहरचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 मे 1972 रोजी निर्माते यश जोहर आणि हीरु जोहर यांच्या घरी करणचा जन्म झाला.  करणने बॉलिवूडमध्ये कुछ कुछ   होता है, कभी   खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना या सिनेमांमसह अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत.

 

वादाशी राहिले नाते...
करण जोहर आणि वादांचे नाते फार जुने आहे. दोन वर्षांपू्र्वी जानेवारी महिन्यात इन्टॉलरन्सवर केलेले वादग्रस्त वक्तव्य असो किंवा एआयबी शोमध्ये अर्जुन आणि रणवीरसोबत केलेले अश्लिल अॅक्ट... करण नेहमीच वादांमुळे चर्चेत राहिला आहे. 'कॉफी विथ करण' या शोमुळेही करण अनेकदा वादात अडकला आहे.


'गे' असल्याचा स्वतः केला खुलासा
करण जोहरचे 'दी अनसुटेबल बॉय' या नावाने आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. पुरुषांसारखाच नॉर्मल आहे की 'गे' (GAY) आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांने दिले. तो म्हणाला होता, 'माझा लैंगिक कल नेमका कुठल्या बाजूनं आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. ते 'तीन' शब्द जगाला ओरडून सांगण्याची मला गरज नाही आणि ते जाहीर करून मला जेलमध्ये जायचं नाही.' 

 

एकेकाळी ट्विंकल खन्नाच्या प्रेमात झाला होता वेडे...
ऑगस्ट 2015 मध्ये ट्विंकल खन्नाच्या मिसेस फनीबोन्स या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करणने कबुली दिली होती, की तो एकेकाळी ट्विंकलच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यावेळी दोघेही बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिकत होते. करणने सांगितले होते, की ट्विंकलने त्याच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला राणी मुखर्जीला सिनेमात कास्ट करावे लागले होते.


झाला FAT to FIT
करण जोहरने त्याच्या ट्विटरवर अकाउंटवर स्वतःचे एक छायाचित्र पोस्ट केले होते. या छायाचित्रात तो खूप लठ्ठ दिसत होते. त्यावेळी त्याचे 120 किलो वजन होते. मात्र व्यायाम आणि योग्य आहारामुळे आपण वजन कमी केल्याचे त्याने सांगितले होते. आज बॉलिवूडचा स्टायलिश मॅन म्हणून त्याला ओळखले जाते. 


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, करण जोहरच्या आयुष्यातील आणखी काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स... आणि बघा Rare Photos... 

बातम्या आणखी आहेत...