आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या ८५व्या वर्षी 'या' अभिनेत्रीवर फिदा झाले होते एमएफ हुसैन, चित्रपटांत घालविली सर्व कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पेंटर मकबुल फिदा हुसैन यांना भारताचे पिकासो म्हटले जाते. त्यांचे आजच्याच दिवशी म्हणजे 9 जून 2011 साली निधन झाले. लंडन येथे निधन झालेल्या हुसैन यांचा जन्म 17 सप्टेंबर 1915 साली झाला होता.त्यांनी बनविलेल्या चित्रांमुळे ते फारच विवादात राहिले. आज मकबुल फिदा हुसैन यांच्याबद्दलकाही खास गोष्टी आपणास सांगणार आहोत.

एमएफ हुसैन यांनी खूप स्ट्रगल करुन एक मोठे चित्रकार बनले होते. चित्रकार असून हुसैन यांना सिनेमाविषयी फारच जवळीक होती. काही बॉलिवूड अभिनेत्रींवर तर ते जीव ओवाळून टाकत असत.

 

हुसैन ज्या बॉलिवूड अभिनेत्रीचे सर्वात मोठे चाहते होते त्यात माधुरी दीक्षितचा नंबर लागतो.हम आपके हैं कौन (1994)’हा चित्रपट हुसैन यांनी 67 वेळा पाहिला होता. माधुरीसाठी ते इतके क्रेझी होते की त्यांनी माधुरीला सोबत घेऊन चित्रपटही काढला त्याचे नाव होते गजगामिनी. अडीच कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने केवळ 26 लाख कमाई केली होती. 

 

इतकेच नव्हे तर त्यांनी माधुरीने लग्नानंतर कमबॅक केलेल्या  ‘आजा नचले’या चित्रपटासाठी त्यांनी दुबईतील लॅम्सी सिनेमा संपूर्णपणे त्यांच्यासाठी बुक केला होता. 

 

केवळ माधुरीच नव्हे तर तब्बुही त्यांची आवडती अभिनेत्री होती. ‘मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज (2004)या चित्रपटासाठी त्यांनी तब्बुला निवडले. पा चित्रपटही यशस्वी झाला नाही पण या चित्रपटातील रंग, सिनेमा बनवण्याची पद्धत अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

 

2006 साली हुसैन अजून एका अभिनेत्रीला पाहून फिदा झाले ती म्हणजे अभिनेत्री अमृता राव. हुसैन यांनी ठरवले की ते तिची पेंटीग करणार नाही पण त्यांनी तिला वाढदिवशी तीन पेंटींग गिफ्ट केले ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एम. एफ. हुसैन यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...