आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरदीनपासून प्रेम चोप्रांच्या जावयापर्यंत, आता सिनेसृष्टीपासून दूर आहेत 90'sचे हे 10 अॅक्टर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 90च्या दशकात आलेल्या 'प्रेम अगन' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता फरदीन खान 44 वर्षांचा झाला आहे.  8 मार्च 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या फरदीनला अभिनयाचा वारसा वडिलांकडून मिळाला आहे. त्याचे वडील फिरोज खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते होते. पण दुर्दैवाने वडिलांऐवढी लोकप्रियता फरदीनला मिळू शकली नाही. याच कारणामुळे 2010 मध्ये आलेला 'दूल्हा मिल गया' हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर फरदीनने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. दीर्घ काळापासून तो सिनेसृष्टीपासून दूर आहे. 


हे अभिनेतेही दिसत नाहीत आता चित्रपटांमध्ये..  
फरदीनच नव्हे तर 90 च्या दशकातील अनेक अभिनेते आता मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत. यामध्ये अभिनेते प्रेम चोप्रा यांचे जावई विकास भल्लापासून ते राहुल रॉय, चंद्रचूड सिंह, अपूर्व अग्निहोत्री, हिमांशु मलिक आणि मुकुल देवसह अनेक अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या अभिनेत्यांच्या लूकमध्येही आता बराच बदल झाला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्यांविषयी सांगतोय, जे दीर्घ काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत.  


फरदीन खान
पदार्पणातील चित्रपट - प्रेम अगन (1998)
शेवटचा चित्रपट - दूल्हा मिल गया (2010)

फरदीन प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये फरदीनने ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘फिदा’, ‘देव’ नो एंट्री, हे बेबी और ‘ऑल द बेस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केले. पण हवे तसे यश त्याला मिळवता आले नाही.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 90 च्या दशकातील अशा अभिनेत्यांविषयी जे आता मोठ्या पडद्यापासून दूर आहेत...   

बातम्या आणखी आहेत...