आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका हिट फिल्मने रात्रीतून स्टार झाली होती ही अॅक्ट्रेस, गेल्या 25 वर्षांपासून आहे अज्ञातवासात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुराग कश्यप यांच्या आगामी 'मुक्काबाज' या चित्रपटात 'नदिया के पार' (1982) मध्ये गुंजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री साधना सिंह झळकणार आहे. 'नदिया के पार' या हिट चित्रपटामुळे साधना एका रात्रीतून स्टार झाल्या. पण पहिलाच चित्रपट हिट ठरल्यानंतरसुद्धा साधना स्वतःला बॉलिवूडमध्ये प्रस्थापित करु शकल्या नाहीत. इतकेच नाही तर त्यांना सिनेसृष्टीतून फारशा चांगल्या ऑफर्सदेखील मिळाल्या नाहीत. पुन्हा एकदा सिनेसृष्टीत नशी आजमावण्यास सज्ज झालेल्या साधना यांच्याशी Divyamarathi.com ने खास बातचित केली. यावेळी साधना यांनी इंडस्ट्रीतील त्यांचे अनुभव शेअर केले. 

 

माझ्यासोबत असे का घडले, ते कळलेच नाही...  
गेल्या 25 वर्षांपासून अज्ञातवासात असलेल्या साधना यांनी सांगितले, 'माझ्यासोबत असे का घडले, हे मला कळलेच नाही. ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतरसुद्धा इंडस्ट्रीने मला स्वीकारले नाही. हिट चित्रपटानंतर बॉलिवूडमधून जास्तीत जास्त ऑफर्स येतील, असे मला वाटत होते. पण असे घडले नाही.' 


साधना पुढे म्हणाल्या, 'गुंजासाठी फॅन्स क्रेझी झाले होते. काही चाहत्यांनी रक्ताने पत्र लिहून मला पाठवले होते. एकदा तर मी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे लाखोच्या संख्येने चाहते मला भेटायला आले होते. गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. अनेकदा तर लोक माझ्या पाया पडत होते. लोकांचे गुंजावरचे प्रेम बघून अशाच प्रकारच्या भूमिका साकारण्याचे मी ठरवले होते.' 


पुढील स्लाईड्सवर वाचा, या बातचीतमध्ये साधना सिंह यांनी आणखी काय काय सांगितले...  

बातम्या आणखी आहेत...