आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

90च्या दशकातील आघाडीच्या 14 अभिनेत्री बॉलिवूडमधून झाल्या आहेत गायब!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90च्या दशकातील या आघाडीची अभिनेत्री सोनू वालियाने 19 फेब्रुवारी रोजी आपला 54 वा वाढदिवस साजरा केला. 19 फेब्रुवारी 1964 रोजी नवी दिल्लीत जन्मलेली सोनूचे खरे नाव सोनिया आहे. तिचे वडील आर्मी ऑफिसर होते. सोनियाने जर्नलिझम आणि सायकॉलॉजीचा अभ्यास केला आहे. 

 

1985मध्ये मिळाला मिस इंडियाचा किताब... 
ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना सोनू वालियाने मॉडेलिंगच्या जगतात प्रवेस खेला. 1985 मध्ये ती मिस इंडिया ठरली. त्याच्या वर्षभरापूर्वी हा किताब जुही चावलाने आपल्या नावी केला होता. 

 

'शर्त'द्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री... 
मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर सोनूने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. 1986 मध्ये रिलीज झालेला शर्त हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. 

 

'खून भरी मांग' या सिनेमाने मिळाली ओळख... 
1988 मध्ये रिलीज झालेल्या 'खून भरी मांग' या सिनेमामुळे सोनू ख-या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली, या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.  याचवर्षी रिलीज झालेल्या तनवीर अहमद दिग्दर्शित आकर्षण या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले. त्यामुळे एका रात्रीत ती बॉलिवूडची सेक्स सिम्बॉल बनली. 

 

जवळपास 30 सिनेमांमध्ये अभिनय...
आपल्या फिल्मी करिअरमध्ये सोनू वालियाने जवळपास तीस सिनेमांमध्ये अभिनय केला. नव्वदच्या दशकात सोनू बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. अभिनेता कबीर बेदीसह तिच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. 

 

आता बॉलिवूडमधून आहे गायब... 

सोनू वालियाप्रमाणेच 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांनी केवळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यच गाजवले नाही तर सोबतच नाव आणि पैसासुद्धा कमावला. मात्र आजच्या काळात या अभिनेत्री जणू बॉलिवूडमधून गायब झाल्या आहेत. यापैकी काही अभिनेत्रींचे अभिनय करिअर सुरुवातीच्या काळातच संपुष्टात आले तर काहींनी यशोशिखरावर पोहोचून सिनेसृष्टीला रामराम ठोकला.

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अज्ञातवासात निघून गेलेल्या 90 च्या दशकातील आणखी काही अभिनेत्रींविषयी...

बातम्या आणखी आहेत...