आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
असे म्हटले जाते, की लग्नानंतर पती-पत्नीमधील प्रेम अधिकच वृद्धिंगत होत जाते. ही गोष्ट बी टाऊनच्या या क्युट कपलवर अगदी तंतोतंत जुळते. आम्ही बोलतोय ते अभिषेक आणि ऐश्वर्याविषयी. या दोघांच्या लग्नाचा आज अकरावा वाढदिवस साजरा केला. 20 एप्रिल 2007 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.
लग्नानंतर अनेकदा या दोघांचे रोमँटिक क्षण कॅमे-यात कैद झाले आहेत. रिअल लाईफमध्ये रोमँटिक असलेल्या या कपलने ऑन स्क्रिनही भरपूर रोमान्स केला आहे. कुछ ना कहो, सरकार राज, गुरु, उमराव जान, ढाई अक्षर प्रेम के या सिनेमांमध्ये हे दोघे एकत्र झळकले. खरं तर खासगी आयुष्यात या दोघांना एकत्र आणण्याचे श्रेय सिनेमांनाच जातं.
अनेक जण सांगतात की, 'बंटी और बबली' सिनेमातील 'कजरारे कजरारे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांचे सुत जुळले. नंतर 'गुरु' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांनी आपल्या प्रेमसंबंधांवर शिक्कामोर्तब केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिषेक आणि ऐश्वर्याची काही निवडक अशी छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये या दोघांमधील स्ट्राँग बाँडिंग स्पष्ट दिसून येते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.