आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gracy Sing, Katrina Kaif And Many More Bollywood Actors Worked In B Grade Movies

B-Grade Films: ग्रेसी सिंगपासून ते कतरिना, रेखापर्यंत, या कलाकारांनी केले बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानची हिरोइन म्हणजेच 'लगान: वंस अपॉन ए टाइम इन इंडिया'मध्ये झळकलेली ग्रेसी सिंह आता अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर असून आध्यात्माकडे वळली आहे. तिने आध्यात्मिक संस्थान ब्रम्हकुमारीज जॉइन केले आहे. ब्रम्हकुमारीजचे हेडक्वार्टर माउंटआबूमध्ये आहे. ग्रेसी दिर्घकाळापासून येथे नियमित जात आहे. 37 वर्षीय ग्रेसीने लगानसह मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामध्ये काम केले होते. अद्याप ग्रेसी अविवाहित आहे.  

 

B-ग्रेड चित्रपटात केले होते काम... 
- ग्रेसीने 1997 मध्ये 'अमानत' या टीव्ही शोमधून अभिनयाला सुरुवात केली. काही काळानंतरच तिला चित्रपटाच्या ऑफर मिळू लागल्या. 'हम आपके दिल में रहते हें' नंतर तिने आमिर खानसोबत 'लगान' चित्रपटात काम केले. यानंतर ग्रेसीचे करिअर उंचावले. 
- ग्रेसीने अजय देवगनसोबत 'गंगाजल'(2003) मध्ये काम केले. परंतू तिची भूमिका छोटेखानी असल्यामुळे तिला नुकसान झाले. यानंतर तिने 'मुन्नाभाई MBBS' (2004) मध्ये काम केले. परंतू यामुळे तिला काहीच फायदा झाला नाही. यामुळे तिने तेलुगु, पंजाबी, गुजराती, मल्याळम, कन्नड, मराठीसारख्या भाषांमधील चित्रपटात काम केले. परंतू तरीही तिला यश मिळाले नाही.
- एक काळ आला त्यानंतर ग्रेसीला चित्रपट मिळणे बंद झाले. मग तिने B-ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणे सुरु केले. एवढेच नाही तर ती सिल्वर स्क्रीनवरुन टीव्हीवर आली. तिने 'संतोषी मां' मालिकेत काम केले.
- टीव्हीवर आल्यानंतर ग्रेसीने 2009 मध्ये डान्स अकॅडमी सुरु केली होती. येथे ती स्वतः डान्स शिकवायची.

 

ग्रेसीच नव्हे तर कतरिना कैफनेही केले होते बी ग्रेड चित्रपटात काम... 
16 जुलै 1983 मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाने मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या 14 व्या वर्षी ती दागिन्यांच्या एका जाहिरातीत झळकली होती. लंडनमध्ये फिल्ममेकर कैजाद गुस्ताद यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला बूम या सिनेमासाठी साइन केले. अमिताभ बच्चन,  जॅकी श्रॉफ आणि गुलशन ग्रोवर स्टारर बूम या बी ग्रेड सिनेमातून 2003 मध्ये कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात मॉडेलची व्यक्तिरेखा साकारणा-या कतरिनाने अनेक बोल्ड आणि बिकिनी सीन्स दिले होते. या सिनेमाला लोकांनी सॉफ्ट पोर्न फिल्म म्हटले होते. एक था टायगर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, जब तक है जान, धूम 3, बँग बँग या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकेली कतरिना आज इंडस्ट्रीची यशस्वी अभिनेत्री आहे. मात्र करिअरची सुरुवात तिला बी ग्रेड सिनेमातून करावी लागली होती. 

 

ग्रेसी आणि कतरिनाशिवाय बॉलिवूडमध्ये आणखी कोणते प्रसिद्ध कलाकार बी ग्रेड सिनेमांत झळकले आहेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

 

बातम्या आणखी आहेत...