आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hall Of Fame Awards 2018: From Deepika Padukone To Mira Rajput Worst Dressed Celebs

दीपिकापासून शाहिदच्या पत्नीपर्यंत, अवॉर्ड शोमध्ये Worst Look मध्ये दिसले हे सेलेब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवॉर्ड शोमध्ये दीपिका पदुकोण, पूजा हेगडे आणि मीरा राजपूत - Divya Marathi
अवॉर्ड शोमध्ये दीपिका पदुकोण, पूजा हेगडे आणि मीरा राजपूत

मुंबईः अलीकडेच मुंबईत 'हॅलो हॉल ऑफ फेम-2018' अवॉर्ड सोहळा पार पडला. अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर एकीकडे अनेक सेलिब्रिटी स्टायलिश आणि गॉर्जिअस लूकमध्ये दिसले. तर दुसरीकडे काही स्टार्सचा वर्स्ट लूकही बघायला मिळाला. या सोहळ्यात दीपिकाव्हाइट कलर फिशकट गाऊनमध्ये पोहचली होती. खरं तर हा लूक दीपिकाला शोभेल असा नव्हता. डीप नेक असलेल्या या ड्रेसच्या स्लीव्सला दिलेले कप शोभून दिसत नव्हते. याशिवाय दीपिकाची हेअर स्टाइलसुद्धा तिच्यावर मॅच होत नव्हती. 


मीरा राजपूतसह या सेलेब्सचा दिसला वर्स्ट लूक... 
- नेहमी स्टायलिश लूकमध्ये दिसणारी शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत अवॉर्ड शोमध्ये ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये पोहोचली. तिचा हा ड्रेस नेमकी साडी होता की गाऊन हेच कळले नाही. 
- तर हृतिक रोशनच्या 'मोहनजो दारो' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पूजा हेगडेचीदेखील हीच अवस्था होती. ती ब्लॅक कलरच्या फ्लिर डीप नेक आणि हाय स्लिट गाऊनमध्ये दिसली. हा ड्रेस तिच्यावर मुळीच शोभून दिसला नाही.
- इतकेच नाही तर रेड कार्पेटवर यूलिया वंतूर, कणिका कपूर, राजकुमार राव, अदा शर्मा, कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ हे सेलेब्सही यावेळी वर्स्ट लूकमध्ये दिसले.


यांना मिळाला अवॉर्ड.. 
या अवॉर्ड सोहळ्यात एंटरटेनर ऑफ द इयर फिमेलचा अवॉर्ड दीपिका पदुकोणला मिळाला. तर रायजिंग स्टार ऑफ द इयर ठरली अभिनेत्री कृती सेनन. करण जोहरला वर्सेटाइल पर्सनॅलिटी ऑफ द इयरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मोस्ट स्टायलिश मॅन ऑफ द इयर ठरला सिद्धार्थ मल्होत्रा. अभिनेता शाहिद कपूरला क्रिटिक्स बेस्ट अॅक्टर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिला एक्सिलन्स इन डिजाइन अवॉर्ड देण्यात आला. अभिनेत्री रेखा यांना सिनेमॅटिक आयकॉन ऑफ द इयरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


अवॉर्ड शोमध्ये पोहोचले हे सेलेब्स... 

- अवॉर्ड शोमध्ये शाहरुख खान, गौरी खान, रेखा, कृती सेनन, रणवीर सिंह, यूलिया वंतूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कणिका कपूर, राजकुमार राव, श्वेता बच्चनसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, अवॉर्ड शोमध्ये वर्स्ट ड्रेसमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...