आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 54 वर्षांच्या श्रीदेवीने केली प्लास्टिक सर्जरी! आता असा दिसतोय Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे काही नवीन फोटोज व्हायरल झाले आहेत. हे फोटोज दिग्दर्शक अनुराग बसूंच्या घरी अलीकडेच झालेल्या सरस्वती पूजनातील आहेत. या पूजेत श्रीदेवी तिचे पती बोनी कपूर यांच्यासोबत पोहोचली होती. खास गोष्ट म्हणजे  या नवीन फोटोजमध्ये 54 वर्षीय श्रीदेवीचे ओठ पुर्वीपेक्षा अतिशय वेगळे दिसत आहेत. यावरुन श्रीदेवीने ओठांची सर्जरी केल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

 

सर्जरीमुळे बिघडला श्रीदेवीचा लूक...  
- सर्जरीविषयी बोलायचे झाल्यास, श्रीदेवीच्या ओठांचा आकार सुधारण्याऐवजी बिघडलेला दिसतोय. त्यामुळे तिच्या चेह-याचा लूक वाईट दिसू लागला आहे. 

 

श्रीदेवीने नाकारली सर्जरीची बातमी...
- परफेक्ट लूकसाठी ओठांची सर्जरी केली का? असा प्रश्न जेव्हा श्रीदेवीला विचारण्यात आला, तेव्हा तिने ही गोष्ट नाकारली. 
 - श्रीदेवीने म्हटले, की अशा कुठलीही सर्जरी मी केलेली नाही.
- श्रीदेवी पुढे म्हणाली, "मी एक आरोगी आयुष्य जगत आहे. फिट राहण्यासाठी मी पावर योगा करते. सोबतच बॅलेंस्ड डाएट माझ्या फिटनेसचे रहस्य आहे."

 

सध्या काय करतेय श्रीदेवी...
- श्रीदेवी काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक  रवी उद्यावर यांच्या 'मॉम' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीच्या सावत्र आईची भूमिका वठवली होती.
- रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी 'जीरो' या चित्रपटात श्रीदेवी एका छोटेखानी भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा, श्रीदेवीचे लेटेस्ट फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...