आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर्यवंशम'मधील 'तो' मुलगा आता दिसतो असा, हीरा ठाकूरच्या मुलाची साकारली होती भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट सेट मॅक्सवर या वाहिनीवर नेहमी दाखवला जातो. हा चित्रपट वारंवार बघितल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटातील पात्र अर्थातच हीरा ठाकुर, गौरी, मेजर साहब आणि विषबाधा करणारी खीर नक्कीच लक्षात असतील. या चित्रपटात हीरा ठाकूर अर्थातच अमिताभ बच्चन यांचा ऑनस्क्रिन मुलगा जो त्याच्या आजोबांसाठी नेहमी खीर घेऊन जातो, त्याचे आता तारुण्यात पदार्पण झाले आहे. आनंद वर्धन हे या कलाकाराचे नाव असून तो आता हॅण्डसम तरुण झाला आहे. विशेष म्हणजे आता हीरो म्हणून त्याला सिनेसृष्टीत पदार्पण करायचे आहे. 


तेलुगू चित्रपटांमध्ये झळकला आहे आनंद...
- 25 फेब्रुवारी रोजी 'सूर्यवंशम' या चित्रपटाच्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण होणार आहेत. या चित्रपटात आनंद वर्धन बालकलाकाराच्या रुपात झळकला होता.
- आनंदने 1997 मध्ये 'Priyaragalu' या  तेलुगु चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. त्यानंतर तो Priyaragalu (1997), Preminchukundam Raa (1997), Suryavamsam (1998), Pelli Peetalu (1998) and Manasantha Nuvve (2001) या तेलुगु चित्रपटांमध्ये झळकला.
- तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेल्या आनंदने बालकलाकार म्हणून 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असून लवकरच हीरो म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची त्याची इच्छा आहे.


आनंदचे आजोबा होते प्लेबॅक सिंगर
- आनंदने मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले आहे.
- आनंदचे आजोबा पी.बी. श्रीनिवास एक प्रसिद्ध पार्श्वगायक होते. त्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले होते.
- आनंदचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, आनंद वर्धनचे निवडक PHOTOS...