आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतपासून सलमान-कतरिनापर्यंत, कुणी शाळेतच गेले नाही तर कुणी अर्ध्यावरच सोडले शिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंग राजपूत, सलमान खान - Divya Marathi
सुशांत सिंग राजपूत, सलमान खान

एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्हीवरील डेली शोजपासून बॉलिवूड सिनेमांपर्यंतचा पल्ला गाठणारा अभिनेता सुशांत सिंह राजपुत आज (21 जानेवारी) त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 21, जानेवारी 1986 रोजी पटना येथे जन्मलेल्या सुशांतला झी टीव्हीवरील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून ओळख प्राप्त झाली. त्यानंतर त्याला बॉलिवूड सिनेमाची ऑफर आली. 'काई पो छे' या सिनेमात सुशांत पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला, त्यानंतर त्याने यशराज बॅनरचा 'शुद्ध देसी रोमांस' हा सिनेमा मिळाला. अशाप्रकारे त्याच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली.

 

बालपणापासूनच अभ्यास हुशार होता सुशांत...
सुशांतचे शालेय शिक्षण नागपूर आणि दिल्लीत झाले. बालपणापासून सुशांत अभ्यात अतिशय हुशार राहिला. तो फिजिक्सचा नॅशनल ओलिम्पियाड विनरसुद्धा राहिला आहे. मात्र अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने दिल्लीतील DCE (देहली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) कॉलेजमधील शिक्षण अर्ध्यावरच सोडले. काही दिवसांपूर्वी अभिनयाचे धडे घेण्यासाठी तो पदेशातसुद्धा जाऊन आला आहे.

 

अनेक सेलिब्रिटींनी अर्ध्यावर सोडले शिक्षण...

बी टाऊनमध्ये अर्ध्यावर शिक्षण सोडणारा सुशांत एकमेव अभिनेता नाहीये. अभ्यासाच्या दुनियेत हे स्टार्स रमले नाहीत. म्हणूनच तर काही स्टार्स दहावी पर्यंतच शिकले तर काहींनी शाळेचे तोंडसुद्धा बघितलेले नाहीये. काहींनी आपले ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण केलेले नाहीये. यामध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, कतरिना कैफ, रणबीर कपूर यांसह ब-याच कलाकारांचा समावेश आहे.


सलमान खानः सिंधिया शाळेतून घेतले शिक्षण
'दबंग' सलमान खान काही वर्षे ग्वालियर येथील सिंधिया स्कूलमध्ये शिकला.त्यानंतर मुंबईतील St. Stanislaus High Schoolमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तो केवळ दहावी पास आहे. दहावीनंतर त्याने वांद्रयाच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र 11 व्या वर्गाची परीक्षाच दिली नाही. त्यामुळे सलमान केवळ दहावीपर्यंतच शिकला आहे.

 

या पॅकेजमधून आम्ही तुमची भेट अशाच काही कमी शिकलेल्या मात्र बॉलिवूडमध्ये यशोशिखरावर असलेल्या सेलिब्रिटींशी घडवून देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडमधील सेलेब्स किती शिकले आहेत...

बातम्या आणखी आहेत...