आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदपूर्वी या अभिनेत्याला ऑफर झाला होता 'पद्मावत', या कारणामुळे नाकारला रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अनेक वादविवादांनंतर संजय लीला भन्साळींचा 'पद्मावत' हा चित्रपट अखेर 25 जानेवारी रोजी रिलीज होत आहे. चित्रपटातील कलाकारांची निवडप्रक्रिया सुरु असताना राणी पद्मिनीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण आणि अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले होते. पण राजा रावल रतन सिंहच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचे नाव फायनल होत नव्हते. या भूमिकेसाठी अभिनेता शाहरुख खानला विचारला झाली होती.

 

या कारणामुळे शाहरुखने नाकारली भूमिका
- रिपोर्ट्सनुसार, पीरियोडिक ड्रामा चित्रपटात शाहरुख लीड भूमिका साकारु इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला.
- याशिवाय आणखी एक चर्चा रंगली होती. ती म्हणजे शाहरुखने या चित्रपटासाठी मानधन दुप्पट केले होते. संजय लीला भन्साळींना शाहरुखची ही फिस परवडणारी नव्हती.
- बातम्यांनुसार, शाहरुख त्याच्या एका चित्रपटासाठी 45 ते 50 कोटींच्या घरात मानधन घेतो. पण या भूमिकेसाठी त्याने 90 कोटींची मागणी केली होती.
- शाहरुखच्या माधनधानाचा आकडा ऐकून संजय लीला भन्साळींनी त्याला चित्रपटात घेण्याचा विचार सोडून दिला आणि दुस-या अभिनेत्याच्या नावाचा विचार केला. 


स्क्रिप्टमध्ये थोडे बदल केल्यानंतर निश्चित झाले शाहिदचे नाव...
- त्यानंतर भन्साळींनी चित्रपटाच्या पटकथेत थोडे बदल करुन अखेर या भूमिकेसाठी शाहिद कपूरला साइन केले.
- शाहिदने या चित्रपटासाठी 9 ते 10 कोटींच्या घरात फीस घेतली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, 'पद्मावत'मधील शाहिद, दीपिका आणि रणवीरचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...