आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 हजार मुलींना करायचे होते हृतिक रोशनसोबत लग्न, लहानपणी या गोष्टीने होता मनात न्यूनगंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता हृतिक रोशनने आज वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 जानेवारी 1974 साली मुंबईत जन्मलेल्या हृतिकने 'कहो न प्यार है' (2000) या चित्रपटातून त्याच्या करिअर कारकिर्दीची सुरुवात केली होती. याअगोदर चित्रपटात त्याने लहानपणीच डेब्यू केला होता. 1980 साली आलेल्या 'आशा' या चित्रपटात हृतिकने सर्वप्रथम अभिनय केला होता. त्यावेळी त्याचे वय केवळ 6 वर्षे होते. लहानपणी अडखळत बोलण्याचा होता आजार...

 

अनेक सुपरहिट चित्रपटात अभिनय केलेल्या आणि उत्तम डायलॉग डिलिव्हरी देणाऱ्या हृतिक रोशनला लहानपणी अडखळत बोलण्याची सवय होती. पण या समस्येला हरवत हृतिक सुपरस्टार बनला आणि आज त्याची ओळख सुपरहिरो म्हणून आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुझानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर हृतिक सध्या सिंगल आहे. पण एकवेळ अशी होती की, हृतिकसाठी लग्न करण्यासाठी 30 हजार मुलींची इच्छा होती आणि त्याबाबत हृतिकच्या घरी रोज प्रपोजल येत असत. 'कहो न प्यार है' या चित्रपटानंतर मुली हृतिकसाठी वेड्या झाल्या होत्या. 2000 साली व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी त्याच्या घरी लग्नासाठी ऑफर्सची रांग लागली होती. 

बातम्या आणखी आहेत...