आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईः अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. वर्कआऊट, डाएट आणि सर्जरीच्या माध्यमातून सुनैना तिचे वाढलेले वजन कमी केले आहे. एकेकाळी तिचे वजन 140 किलो होते. आता वजन कमी करुन ते 65 किलो झाले आहे. सुनैनाप्रमाणेच तिची मुलगी आणि हृतिकची भाची सुरानिका हिनेदेखील तिचे वजन कमी केले आहे. आई आणि मामाकडून प्रेरणा घेऊन सुरानिका पुर्वीपेक्षा आता स्लिम झाली आहे. अलीकडेच हृतिकने सुरानिकाचा एक फोटो शेअर करुन तिच्या ट्रान्सफॉर्मेशनविषयी सांगितले.
सावत्र आईसोबत राहते सुरानिका...
- हृतिकच्या आईवडील, पुर्वाश्रमीची पत्नी, मुले आणि बहिणीविषयी तसं पाहता लोकांना बरंच काही ठाऊक आहे. पण त्याची भाची सुरानिका रोशन हिच्याविषयी कधी फारसे ऐकण्यात आले नाही.
- सुरानिका यूएसध्ये शिकत आहे. ती तिची आई सुनैनासोबत राहात नाही. यूएसमध्ये ती तिचे वडील, सावत्र आई आणि सावत्र बहिणीसोबत राहते.
- हृतिकच्या भाचीची तिच्या सावत्र आईसोबत खूप चांगली बाँडिंग आहे. शिवाय ती रोशन कुटुंबीयांच्याही अतिशय जवळ आहे.
- 20 वर्षीय सुरानिकाची फक्त सावत्र आईसोबतच नव्हे तर सावत्र बहिणीसोबतही अतिशय चांगली बाँडिंग आहे.
- सुरानिकाचे रोशन फॅमिलीपेक्षा वडील आशिष सोनी, आई सोनाली आणि बहिणीसोबतचे जास्तीत जास्त फोटोज बघायला मिळतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बरेच फॅमिली फोटोज आहेत.
सुनैना आणि तिच्या पहिल्या नव-याची मुलगी आहे सुरानिका...
- हृतिकची बहीण सुनैना रोशन हिची दोन लग्ने झाली आहेत. तिचे पहिले लग्न बिझनेसमन आशिष सोनीसोबत झआले होते. केवळ आठ वर्षे हे लग्न टिकले. त्यानंतर 2000मध्ये सुनैना आशिषपासून वेगळी झाली.
- सुनैना आणि आशिष यांचीच सुरानिका ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर सुरानिकाची कस्टडी आशिष सोनीला मिळाली. सुनैनापासून विभक्त झाल्यानंतर आशिषने टीव्ही अभिनेत्री असलेल्या सोनाली मल्होत्रासोबत लग्न केले.
- तर दुसरीकडे सुनैनाने आशिष सोनीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर बिझनेसमन मोहन नागरसोबत लग्न थाटले.
पुढील स्लाईड्सवर बघा, हृतिकची भाची सुरानिकाचे निवडक PHOTOS...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.