आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - हतिक रोशन पुन्हा एकदा बोहल्यावर तढण्यास सज्ज झाला आहे. मीडियामध्येही हृतिकच्या लग्नाबद्दल फार चर्चा होत आहे. अशातच अशा एका मुलीचे नाव समोर आले आहे जी हृतिकची पत्नी होऊ शकते. पण ती मुलगी दुसरी कोणी नसून ती त्याची पहिली पत्नी सुझान खान आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक पुन्हा त्याचीच एक्स वाईफ सुझान खानसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. दोघांना घटस्फोटानंतरही अनेकदा सोबत वेळ घालवताना पाहिले आहे. या कारणाने होतेय चर्चा...
एका पॉप्युलर वेबसाईटवर आलेल्या वृत्तानुसार, दोघांच्या एका जवळच्या सुत्राने ते लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा होत असल्याची चर्चा होत आहे. दोघे वेगळे झाल्यानंतरही एकमेकांसोबत घालवण्यात येणारा वेळ आणि त्या वेळात ते एकमेकांच्या अजून जवळ येत असल्याचे समजते.
मुलांसाठी एकत्र येऊ शकतात सुझान-हृतिक...
- माहितीनुसार, दृतिकचे दोन्ही मुले ऋहान आणि ऋदानसाठी दोघे पुन्हा एक होऊ शकतात. हृतिक आणि सुझान नेहमीच मुलांसोबत व्हॅकेशनवर तसेच आउटींगला बाहेर जातात विशेष म्हणजे तेही घटस्फोटानंतर.
- मुलांच्या उत्तम पालनपोषणासाठी दोघांनी भेटत राहणे गरजेचे आहे असे ते मानतात आणि मुलांना आई किंवा वडिलांची कमी वाटू नये म्हणून भेटतात.
डिसेंबर 2013 साली झाला दोघांचा घटस्फोट..
- 13 डिसेंबर 2013 रोजी दोघांनी त्यांचे 17 वर्षाचे लग्न मोडले होते. घटस्फोटानंतर दोन्ही मुले हृतिककडेच राहतात.
- एका प्रेस काँफ्रेसदरम्यान हृतिकने सांगितले की, सुझानने माझ्यापासून वेगळे होण्याच्या आणि आमचे 17 वर्ष जूने नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक-सुझानचे सोबतचे फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.