आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 स्टार्ससाठी अखेरचे ठरले हे चित्रपट, रिलीज होण्यापूर्वीच पडला आयुष्यावर \'पडदा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2017 हे वर्ष संपून आता 2018 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात अगदी जोमात सगळे कामाला लागले. बॉलिवूडम स्टार्ससुद्धा त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंग, प्रमोशन आणि रिलीजच्या कामाला लागले आहेत. पण गेल्या वर्षी बॉलिवूडने दोन मोठे चेहरे  कायमचे गमावले. आम्ही बोलतोय ते प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी आणि अभिनेत्री रिमा लागू यांच्याविषयी.

 

ओम पुरी यांना या जगाचा निरोप घेऊन नुकतेच एक वर्ष उलटले आहे. तर रिमा लागू यांनी गेल्यावर्षी 18 मे रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण  दोन्ही कलाकारांचे दर्शन त्यांच्या निधनानंतर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना घडले. ओम पुरी यांच्या निधनाच्या पाच महिन्यांनी 'ट्युबलाइट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर रिमा लागू  देवा या मराठी चित्रपटात झळकल्या. डिसेंबर 2017 ला 'देवा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हे कलाकार आता आपल्यात नाहीत, पण कलाकृतींच्या माध्यमातून ते कायम आपल्यातच राहतील. 

 

रिमा लागू,  ओम पुरी यांच्यासह बॉलिवूडच्या आणखी काही कलाकारांचे त्यांच्या निधनानंतर चित्रपट रिलीज झाले होते, एक नजर टाकुयात...

 

>> दिव्या भारती

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी दिव्या भारतीने या जगाचा कायमचा निरोप घेतला. तिच्या निधनाच्या नऊ महिन्यांनी रिलीज झालेला 'शतरंज' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

 

 

आणखी कोणकोणत्या कलाकारांचे चित्रपट त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाले, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...