आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#26GoldenYearsOfKingKhan : या फ्लॉप अॅक्टरमुळे शाहरुख खान बनला सुपरस्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 25 जून 1992 रोजी 'दीवाना' या सिनेमाद्वारे शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. शाहरुखला फिल्म इंडस्ट्रीत येऊन 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातील 'कोई ना कोई चाहिए...' हे गाणे हिट झाले होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला होता. या सुपरहिट सिनेमात शाहरुख खानसोबत अॅक्ट्रेस दिव्या भारती आणि अॅक्टर ऋषी कपूर होते. या सिनेमाच्या यशानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही. 'दीवाना'नंतर 1992 सालीच त्याचे 'चमत्कार', 'दिल आशना है' आणि 'राजू बन गया जेंटलमेन' हे तीन सिनेमे रिलीज झाले होते. पण शाहरुखला हा सिनेमा कसा मिळाला हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा सिनेमा शाहरुखला नव्हे तर अभिनेता अरमान कोहलीला ऑफर झाला होता. आज अरमानची गणना बॉलिवूडच्या सुपरफ्लॉप अभिनेत्यांमध्ये होते. 

 

काही सीन्सचे शूटिंग केल्यानंतर अरमानने सोडला होता सिनेमा...  
दिग्दर्शक राज कंवर यांच्या 'दीवाना' सिनेमात शाहरुख खानने साकारलेली भूमिका अरमान कोहलीला ऑफर झाली होती. अरमानने काही भागांचे शूटिंगसुद्धा केले होते. पण अचानक त्याने सिनेमात काम करण्यास नकार दिला. अरमानने ऐनवेळी सिनेमा सोडल्याने दिग्दर्शक काळजीत पडले होते. त्याच काळात कामाच्या शोधात असलेल्या शाहरुखवर त्यांची नजर पडली आणि त्यांनी  'दीवाना'साठी त्याला फायनल केले. या सिनेमानंतर शाहरुख सुपस्टार तर अरमान कोहली फ्लॉप स्टार बनला.  

 

हलाखीच्या परिस्थितीत गेले शाहरुखचे बालपण
शाहरुख आज बॉलिवूडवर राज्य करतोय, मात्र त्याचा हा प्रवास बराच संघर्षमय होता. शाहरुखने मुंबईत अनेक दिवस संघर्ष केला. 1985 मध्ये दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने जामिया इस्लामिया कॉलेजमधून मास कम्युनिकेशनची पदवी प्राप्त केली. याचकाळात तो थिएटरशीसुद्धा जुळला. शाहरुख केवळ 15 वर्षांचा असताना त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर 1990 मध्ये त्याच्या आईनेसुद्धा या जगाचा कायमचा निरोप घेतला. आईच्या निधनानंतर 1991 मध्ये तो मुंबईत दाखल झाला आणि त्याचा सिनेसृष्टीतील प्रवासाच्या संघर्षाला सुरुवात झाली.

 

1993 ते 1994 पर्यंत अँटी हीरोची प्रतिमा
शाहरुख आज सिने इंडस्ट्रीत रोमँटिक हीरोच्या रुपात ओळखला जातो. मात्र बॉलिवूड करिअरला सुरुवात केल्यानंतर वर्षभरातच त्याने 'बाजीगर' आणि 'डर' या सिनेमांतून स्वतःला अँटी हीरोच्या रुपात प्रस्थापित केले. दोन्ही सिनेमांतील त्याने साकारलेल्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. 'डर' या सिनेमातून शाहरुखची यशराज फिल्म्समध्ये एन्ट्री झाली जी आजही कायम आहे. 1994 मध्ये शाहरुखचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला होता, त्याचे नाव होते 'कभी हां कभी ना'. कुंदन शाह यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यानंतर रिलीज झालेल्या 'अंजाम' या सिनेमाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र एसआरकेचा प्रवास कायम राहिला. या सिनेमात साकारलेल्या भूमिकेने शाहरुखला बेस्ट व्हिलनचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिला होता.

 

1995 मध्ये शाहरुख बनला रोमँटिक हीरो

करिअरच्या सुरुवातीच्या काळात अँटी हीरोची भूमिका साकारल्यानंतर शाहरुखसाठी 1995 हे वर्ष खास ठरले. यावर्षी आलेल्या राकेश रोशन यांच्या 'करण अर्जुन' आणि आदित्य चोप्रांच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमात शाहरुख झळकला. दोन्ही सिनेमांत एसआरकेने रोमँटिक हीरोच्या रुपात दिसला. हे दोन्ही सिनेमे हिट ठरले. येथूनच निगेटिव्ह शेडच्या भूमिका साकारणा-या शाहरुखला इंडस्ट्रीत रोमँटिक हीरोचा दर्जा मिळाला.

 

या 26 वर्षांत शाहरुख खानच्या ऑन स्क्रिन लूकमध्ये किती बदल झाला, हे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...