आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 रुपये होती रोहित शेट्टीची 1st सॅलरी, जाणून घ्या किती होती 8 Stars ची पहिली कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमांचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 मार्च 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या रोहित यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यावेळी ते केवळ 17 वर्षांचे होते.  रोहित शेट्टी यांचे वडील एम बी शेट्टी फाइट मास्टर होते. त्यांनी अनेक हिंदी आणि कन्नड सिनेमांत कामे केली. तर आई रत्ना या ज्युनिअर आर्टिस्ट होत्या.  

 

रोहित शेट्टी यांना मिळाले होते फक्त 35 रुपये...
रोहित शेट्टी यांनी कुकू कोहलींच्या 'फूल और कांटे' या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या सिनेमासाठी त्यांना दर दिवशी फक्त 35 रुपये मानधनाच्या रुपात मिळाले होते. 2003 मध्ये त्यांनी 'जमीन' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. मात्र त्याला खरी ओळख 'गोलमाल फन अनलिमिटेड' या सिनेमातून मिळाली.


शाहरुखला मिळाले होते 50 रुपये... 
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने पंकज उदास यांच्या एका गजल कॉन्सर्टमध्ये अटेंडर म्हणून काम केले होते. तो पाहूण्यांना सीटपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होता. या कामासाठी त्याला फक्त 50 रुपये मिळाले होते. हा खुलासा स्वत: शाहरुखने 2012मध्ये एक टि्वट करून केला होता.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, बॉलिवूडच्या A लिस्टर्स स्टार्सची किती होती पहिली कमाई...

बातम्या आणखी आहेत...