आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'परी\'पासून पॅडमॅनपर्यंत, पाकिस्तानने BAN केले आहेत हे 12 भारतीय चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडच्या काळात रिलीज झालेले 'पॅडमॅन आणि 'अय्यारी' हे चित्रपट पाकिस्तानाने बॅन करण्यात आले. त्यानंतर आता तिथे अनुष्का शर्माचा 'परी' या चित्रपटाच्या रिलीजवरही बंदी घालण्यात आली आहे. तेथील सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार चित्रपटात काळी जादू प्रोमोट करण्यात आली. इस्लाममध्ये काळी जादू कदापी मान्य नाही. हा चित्रपट काळ्या जादूला प्रोमोट करणारा असल्याने त्याला पाकिस्तानात प्रदर्शनाची परवानगी दिली गेली नाही.  इस्लाममध्ये ब्लॅक मॅजिक हराम आहे. 

 

इस्लामची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आली...  
- सेन्सॉर बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटामध्ये कुराणातील काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. सोबतच हिंदू मंत्रांसोबत कुराणातील काही गोष्टी एकत्र केल्याने या चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे.
- पाकिस्तान फिल्म डिस्ट्रीब्यूशन असोसिएशनचे अध्यक्ष चौधरी एजाज कमर यांनी चित्रपटाविषयी म्हटले, की कुठलाही चित्रपट आमची संस्कृती आणि इस्लामिक हिस्ट्रीच्या विरोधात असेल, तर त्यावर बंदी घालणे गरजेचे आहे.
- तसे पाहता, यापूर्वीही पाकिस्तानात अनेक भारतीय चित्रपटांच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगत आहोत...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पाकिस्तानात Ban झालेल्या भारतीय चित्रपटांविषयी.. 

बातम्या आणखी आहेत...