आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष बिग बींचा: दिखावा करण्यासाठी बंगल्यावर उभे करायचे मित्रांच्या गाड्या, कोर्टात होत्या 55 केस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे  महानायक अमिताभ बच्चन यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही. वयाच्या पंचाहत्तरीतही बिग बी तरुणांना लाजवेल एवढ्या उत्साहात ते काम करत आहेत. अलीकडेच त्यांच्या 102 नॉट आऊट या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ऋषी कपूर यांच्या 102 वर्षांच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे. बिग बींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये विविधांगी भूमिका वठवल्या. कधी त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले, तर कधी चित्रपट फ्लॉप ठरले. 


यशोशिखरावर असताना बिग बींच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा ते दिवाळखोर झाले. त्यांची एबीसीएल ही कंपनी कर्जात बुडाली. त्यांचे एकामागून एक आलेले चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांच्या घराबाहेर देणेक-यांची रांग लागली. एवढ्या कठीण परिस्थितीला अमिताभ धीराने सामोरे गेले. नेमके काय-काय घडले होते अमिताभ यांच्यासोबत याचा उल्लेख त्यांनी स्वतः भास्कर ग्रुपसोबत बोलताना केला आहे. 


बिग बी म्हणतात, ''मी तोच आहे. फक्त वयानुसार माझ्या कामात थोडे बदल झाले आहेत. पुर्वी मी मुख्य भूमिका साकारायचो, आता मी चरित्र भूमिका करतो. माझ्या वाईट काळात मी टीव्हीवर काम केले आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाने माझ्या बुडत्या करिअरला वर आणले.'' 


बॉलिवूडच्या महानायकाचा कसा होता संघर्ष, कसे ते या संघर्षातून वर आले, हे जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांत खास ग्राफिक्समधून... 

बातम्या आणखी आहेत...