आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः बॉलिवूडचे सुपरस्टार राहिलेले राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. म्हणजेच या बाप-लेकीचा जन्म एकाच दिवशी म्हणजे 29 डिसेंबर रोजी झाला. राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसर येथे झाला होता. त्यांनी 1966 मध्ये दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या 'आखिरी खत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 180 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता. तर 29 डिसेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या ट्विंकलने तिच्या फिल्मी प्रवासाला 'बरसात' (1995) द्वारे सुरुवात केली होती. पण काही निवडक चित्रपट केल्यानंतर 2001 मध्ये ट्विंकलने फिल्मी दुनियेला रामराम ठोकला आणि इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.
सेम डेटला असतो या सेलिब्रिटींचा बर्थडे...
राजेश खन्ना आणि ट्विंकल खन्ना यांच्याप्रमाणेच बॉलिवूडच्या आणखी स्टार्सचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. पण हे सेलिब्रिटी बाप-लेक किंवा एकमेकांच्या नात्यात नाहीत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. म्हणजे त्यांचे जन्माचे वर्ष वेगळे आहे, पण तारीख एकच आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडच्या अशा सेलिब्रिटींविषयी जे सेम डेटला वाढदिवस साजरा करतात...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.