आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Box Office Clash: Hollywood Superhero Movies Collection Too Better Than Bollywood Film

जेव्हा-जेव्हा भारतात झाले बॉलिवूडसोबत क्लॅश, हॉलिवूड चित्रपटांनीच नेहमी मारली बाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड, बॉलिवूडवर वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे. हॉलिवूड चित्रपट त्यांच्या दर्जेदार निर्मितीमुळे प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. ही गोष्ट भारतात कमाई करत असलेल्या हॉलिवूड चित्रपटांनी सिद्ध केली आहे. हॉलिवूडचे अनेक चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाले आहेत, यामध्ये सर्वाधिक सुपरहीरो चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडच्या काळातील उदाहरण घ्यायचे झाल्यास 'ब्लॅक पँथर' हा हॉलिवूड चित्रपट कमाईत 'अय्यारी' या बॉलिवूड चित्रपटाच्या पुढे निघाला आहे. 1000 स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटाने 19.35 कोटींची कमाई केली आहेत, तर दुसरीकडे 1750 स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या 'अय्यारी' या चित्रपटाला आतापर्यंत फक्त 11.70 कोटींच्या कमाईवर समाधान मानावे लागले आहे. 


'तुम्हारी सुलू'च्या पुढे निघाला 'जस्टिस लीग'...
- 17 नोव्हेंबर 2017 रोजी रिलीज झालेल्या विद्या बालन स्टारर 'तुम्हारी सुलू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
- चित्रपटाने एकुण 36 कोटींचा गल्लादेखील जमवला. पण एवढी कमाई करुनदेखील हा चित्रपट कमाईत मात्र 'जस्टिस लीग' या हॉलिवूड चित्रपटाच्या मागे राहिला.
- दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर क्लॅश झाले होते. पण 'जस्टिस लीग'ने 41 कोटींहून अधिकचे कलेक्शन केले.
- तसे पाहता हॉलिवूड चित्रपट बॉलिवूडच्या वरचढ ठरत असल्याची ही फक्त दोनच उदाहरणे नाहीत. आज या पॅकेजमधून आम्ही वाचकांना अलीकडच्या काळात बॅक टू बॅक रिलीज झालेल्या 5 हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांच्या क्लॅशविषयी सांगत आहोत. यामध्ये नेहमीप्रमाणे सुपरहीरो थीमवर आधारित हॉलिवूड चित्रपट वरचढ ठरले. 


या चित्रपटांविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...