आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात झाला नाही \'पद्मावती\' दीपिका पदुकोणचा जन्म, परदेशात जन्मल्या या 6 अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'पद्मावत' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या ऐतिहासिक चित्रपटात तिने राणी पद्मावतीची भूमिका साकारली आहे. अनेक वादांनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आणि प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. चित्रपटातील दीपिकाचा वावर लक्ष वेधून घेणारा आहे. राणी पद्मावतीच्या भूमिकेत दीपिकाने प्राण ओतला आहे. या चित्रपटात तिच्यासह रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे.  

 

भारतात झाला नाही दीपिकाचा जन्म... 
32 वर्षीय दीपिका पदुकोणचा जन्म भारतात नव्हे तर परदेशात झाला आहे. 5 जानेवारी 1986 रोजी कोपनहेगन, डेन्मार्क येथे तिचा जन्म झाला. बॉलिवूडमध्ये दीपिकाच नव्हे तर कतरिना कैफ, आलिया भट, जॅकलिन फर्नांडिस, सनी लियोनीसह अनेक अभिनेत्री परदेशी जन्माला आल्या. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगतोय.


वयाच्या 19 व्या वर्षी सुरु केले होते मॉडेलिंग करिअर..
वयाच्या 19 व्या वर्षी दीपिकाने पहिल्यांदा एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता. तिला किंगफिशर फॅशन अवॉर्डच्या मॉडेल ऑफ द इयर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वयाच्या 21 व्या वर्षी दीपिका मुंबईत दाखल झाली आणि तिला हिमेश रेशमियाच्या 'नाम है तेरा' या म्युझिक व्हिडिओत काम करण्याची संधी मिळाली. 'ऐश्वर्या' या कन्नड चित्रपटातून दीपिकाने फिल्मी करिअरला सुरुवात केली. 2007 मध्ये आलेल्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आपल्या 11 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये  दीपिकाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. 'लव आजकल' (2009), 'हाउसफुल' (2010), 'कॉकटेल' (2012), 'रेस 2' (2013), 'ये जवानी है दीवानी' (2013), 'चेन्नई एक्सप्रेस' (2013), 'गोलियों की रासलीला राम-लीला' (2013), 'पीकू' (2015), 'पद्मावत' (2018) हे दीपिकाचे गाजलेले चित्रपट आहेत. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री भारतात नव्हे तर परदेशात जन्मल्या...  

बातम्या आणखी आहेत...