आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चंद्रकांता\'पासून \'हिंदी मीडियम\'पर्यंत, गेल्या 24 वर्षांत असा बदलत गेला इरफानचा Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता इरफान खानला मेंदुचा कर्करोग असल्याचे वृत्त सोशल मीडियावर वा-यासारखे पसरले आहे. पण इरफानचे निकटवर्तीय आणि ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी या बातमीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. इरफान अस्वस्थ आहे, पण मीडियात त्याच्या तब्येतीविषयी येणा-या वृत्तांमध्ये तथ्य नाही. तो रुग्णायलात दाखल असल्याचे वृत्त खोटे असून सध्या दिल्लीत आहे, असे कोमल नाहटांनी म्हटले आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या इरफान खानला 'चंद्रकांता' या टीव्ही शोमधून खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्याने बद्रीनाथ ही व्यक्तिरेखा साकारली होती. 

 

या चित्रपटांमध्ये साकारल्या अविस्मरणीय भूमिका...  
- 1988 मध्ये आलेल्या 'सलाम बॉम्बे' या चित्रपटातून इरफान खानने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने लेटर रायटरची भूमिका वठवली होती. त्याला खरी ओळख मिळाली ती 2002 मध्ये आलेल्या 'हासिल' या चित्रपटातून. या चित्रपटात इरफानने रणविजय सिंह ही व्यक्तिरेखा साकारली होती. 'हासिल' या चित्रपटातील निगेटिव्ह रोलसाठी इरफानला फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला होता. 
- यानंतर इरफानने मकबूल, आन, द किलर, नेमसेक, बिल्लू, 7 खून माफ, पानसिंह तोमर, लाइफ ऑफ पाइ, डी-डे, द लंचबॉक्स, किस्सा, पीकू, तलवार, इनफर्नो, मदारी, हिंदी मीडियम आणि करीब-करीब सिंगल सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.


हॉलिवूडमध्येही केले आहे काम... 
- इरफानने बॉलिवूडसह हॉलिवूडच्याही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'अ माइटी हार्ट', द वॉरियर, द दार्जिलिंग लिमिटेड, पार्टीशन, न्यूयॉर्क आई लव यू, द अमेजिंग स्पाइडरमऍन, लाइफ ऑफ पाइ, इनफर्नो या हॉलिवूड चित्रपटांमध्ये इरफानने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, गेल्या 24 वर्षांतील विविध चित्रपटांतील इरफानचे खास Looks...  

बातम्या आणखी आहेत...