आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

140 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे \'देवसेना\' उर्फ \'भागमती\', असे आहे CAR कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबादः 'बाहुबली' या चित्रपटात देवसेनेची भूमिका वठवणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या आगामी 'भागमती'  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनुष्काचे नवीन रुप बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अनुष्कावर भूतप्रेताची सावली असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिची भूमिका अंगावर शहारा आणणारी आहे. हा चित्रपट तेलुगु, तामिळ आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहेत.


26 जानेवारी रोजी रिलीज होणार भागमती...
- अशोक के दिग्दर्शित भागमती या चित्रपटाचे संगीतकार एस.थमन आहेत. येत्या 26 जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज होतोय. बाहुबली नंतर रिलीज होणारा अनुषअकाचा हा पहिला चित्रपट आहे.
- या चित्रपटात अनुष्कासह उन्नी मुकुंदन, जयराम, आशा सरथ आणि आदि पिनिशेट्टी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  वामसी कृष्णा रेड्डी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
- 'भागमती'च्या रिलीजच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला दीपिका पदुकोणचा 'पद्मावत' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हे चित्रपट रिलीज होत आहेत. 

 

अनुष्का एका फिल्मसाठी घेते चार ते पाच कोटी रुपये मानधन..

-अनुष्का शेट्टी साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती चार ते पाच कोटींच्या घरात मानधन घेत असते. नेटवर्थियरच्या रिपोर्टनुसार, अनुष्का 22 मिलियन डॉलर (सुमारे 140 कोटी रुपये) संपत्तीची मालकिण आहे.

 

आलिशान घर...
- हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश परिसरातील वुड्स अपार्टमेंटच्या 6th फ्लोअरवर अनुष्काचे आलिशान घर आहे.
- अनुष्का एका सिनेमासाठी सुमारे 4 ते 5 कोटींच्या घरात मानधन घेते.
- लग्झरी कारची आवड असलेल्या अनुष्काजवळ अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या कार आहेत. बीएमडब्ल्यू 6, ऑडी A6, ऑडी Q5 आणि टोयोटा कोरोला या लग्झरी गाड्या तिच्या कलेक्शनमध्ये आहेत.

 

अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती करते अनुष्का...
- अनुष्का एमबीएस ज्वेलर्स, द चेन्नई सिल्क, इंटेक्स मोबाइल, कोलगेट अॅक्टिव सॉल्ट आणि डाबर आंवला या मोठ्या ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकली आहे.
- अनुष्का शेट्टीने तिच्या ड्रायव्हरला सुमारे 12 लाखांची कार गिफ्ट केली होती.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, अनुष्का शेट्टीविषयी A to Z आणि सोबतच बघा, तिचे कार कलेक्शन...

आलिशान घर...

बातम्या आणखी आहेत...