आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीने केला 11 हजार कोटींचा घोटाळा, एवढ्या पैशांत बॉलिवूडमध्ये होऊ शकतात ही कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः देशातील सर्वात मोठी दुसरी बँक पंजाब नॅशनल बँकेत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा 177.17 कोटी डॉलर अर्थातच 11,356 कोटींचा आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. नीरव मोदी आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे षडयंत्र रचले. 2011 पासून या घोटाळ्याला सुरुवात झाली. हजारो कोटींची रक्कम बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या माध्यमातून परदेशी अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करण्यात आली. 

 

नीरव मोदी भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे, ज्याला भारतातील 'डायमंड किंग' असेही म्हटले जाते. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.

 

11 हजार कोटी या रक्कमेविषयी बोलायचे झाल्यास, एवढ्या रकमेतून बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टी वारंवार केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ 11 हजार कोटींमध्ये मुंबईतील सर्वात महागड्या बंगल्यांपैकी एक असलेल्या शाहरुखच्या 'मन्नत'सारखे 55 बंगले खरेदी केले जाऊ शकतात. इतकेच नाही तर बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी दीपिका पदुकोण एवढ्या पैशांत 100 चित्रपटांमध्ये काम करु शकते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला नीरव मोदी घोटाळ्याच्या रकमेतून बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आणखी काय-काय केले जाऊ शकते, अर्थातच एवढी मोठी रक्कम बॉलिवूडसाठी किती महत्त्वाची ठरु शकते, हे सांगत आहोत.  


पुढील स्लाईड्सवर वाचा, 11 हजार कोटींच्या निर्मिती खर्चातून 'बाहुबली 2'सारखे किती चित्रपट बनू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...