आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'पासून ते रवी तेजापर्यंत, हे आहेत या 12 साऊथ सुपरस्टार्सचे Real Name

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबादः दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर 'बाहुबली' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता  प्रभास दिग्दर्शक करण जोहरच्या रोमँटिक धाटणीच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. तीन वर्षांपूर्वीच प्रभासने या चित्रपटासाठी होकार दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने सांगितले आहे. खरं तर प्रेक्षक प्रभासला त्याच्या ख-या नावापेक्षा 'बाहुबली' या चित्रपटातील अमरेंद्र बाहुबली या नावानेच ओळखू लागले आहेत. प्रभासच्या ख-या नावाविषयी फारसे कुणालाही ठाऊकही नसावे. त्याचे खरे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापती आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांचे खरे नाव बदलले आहे. या यादीत रवी तेजा, चिरंजीवी, महेश बाबू, ममूटी, मोहनलाल, सूर्या, पवन कल्याण या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. या पॅकेजमधून आज आम्ही तुम्हाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांची खरी नाव काय आहेत ते सांगत आहोत.

 

प्रभास
प्रभासचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नईत झाला. त्याचे वडील दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माते सूर्यनारायण राजू असून आईचे नाव शिव कुमारी आहे. 2002 मध्ये प्रभासने 'ईश्वर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत डेब्यू केले होते. त्यानंतर तो 'राघवेंद्र' (2003), 'वर्षम' (2004), 'चक्रम' (2005), 'योगी' (2007), 'एक निरंजन' (2009), 'रेबेल' (2012) 'बाहुबली : द बिगनिंग' (2015) आणि बाहुबली : द कन्क्लूजन या गाजलेल्या सिनेमांत झळकला. प्रभास लवकरच 'साहो' या चित्रपटात झळकणार आहे.


रवी तेजा
रवी तेजाचे संपूर्ण नाव रविशंकर राजू भूपतिराजू आहे. 26 जानेवारी 1968 रोजी जग्गमपेटा (आंध्र प्रदेश) येथे जन्मलेल्या रवी तेजाने 26 मे 2002 रोजी कल्याणीसोबत लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. थोरली मुलगी मोक्षदाचा जन्म 6 जून 2013 रोजी झाला. तर त्याच्या लहान मुलाचे नाव मानित भूपतिराजू आहे. रवी तेजाने 1990 साली 'कर्तव्यम' या चित्रपटातून डेब्यू केले होते.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, साऊथ सुपरस्टार्सचे Real Name...

बातम्या आणखी आहेत...