आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका इंस्टाग्राम पोस्टसाठी प्रिया घेते लाखो रुपये, कमाईत सोनाक्षी-युवराजला टाकले मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कोट्यवधी लोकांना आपल्या अदांनी घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियला हिला न ओळखणारा आता शोधून सापडणार नाही. 25 सेकंदांच्या एका व्हिडिओने प्रसिद्ध झालेल्या प्रियाचे सध्या इंस्टाग्रामवर 50 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या प्रसिद्धीचा प्रियाला आता एवढा फायदा झाला, की ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून आता लाखोंची कमाई करत आहे. अलीकडेच प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक मोठे ब्रॅण्ड्स प्रमोट केले. रिपोर्ट्सनुसार, प्रिया तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एखाद्या ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी 8 लाख रुपये घेते. 


इंस्टाग्रामवरुन होणा-या कमाईत प्रियाने पछाडले सोनाक्षी-युवराजला... 
- रिपोर्ट्सनुसार, प्रिया एका सोशल मीडिया पोस्टसाठी 8 लाख रुपये मानधन घेते. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला यासाठी 5 लाख रुपये मिळतात. तर क्रिकेटपटू युवराज सिंगदेखील एका सोशल मीडिया पोस्टसाठी 5 लाख रुपये फिस घेतो.
- इतकेच नाही तर प्रियाची लोकप्रियता बघून अनेक नामांकित ब्रॅण्ड्स तिच्याकडे जाहिरातीच्या ऑफर घेऊन येत आहेत. प्रिया जगातील सर्वात मोठ्या स्टार्सच्या यादीत सामील झाली असून दिवसेंदिवस तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढत चालली आहे.
- प्रिया  लवकरच 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात रिलीज होणार आहे. प्रियाला लोकप्रियता मिळण्यापूर्वी हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज करण्यात येणार होता. 


चित्रपटासाठी केली आहे 2 कोटींची डिमांड...
- एका साऊथ वेब पोर्टलच्या रिपोर्ट्सनुसार, अभिनेता निखिल सिद्धार्थच्या आगामी चित्रपटासाठी निर्मात्यांनी प्रिया प्रकाशला विचारणा केली आहे.
-  या चित्रपटासाठी प्रियाने दोन कोटींच्या मानधनाची मागणी केल्याची चर्चा आहे. 18 वर्षीय प्रिया मुळची केरळची रहिवाशी आहे. ती सध्या थ्रिसूरच्या विमला कॉलेजमधून बी. कॉमचे शिक्षण घेत आहे.
- प्रियाला मॉडेलिंगची आवड असून तिने आतापर्यंत तीन म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. याशिवाय तिला डान्सिंग आणि सिंगिंगचीही आवड आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, एका सोशल मीडिया पोस्टसाठी किती मानधन घेतात विराट कोहलीसह इतर स्टार्स...

बातम्या आणखी आहेत...