आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कापासून नागार्जुनच्या सूनेपर्यंत, जाणून घ्या फिल्ममधून किती कमावतात 15 साऊथ अॅक्ट्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः सर्वाधिक मान घेणा-यांमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रीदेखील मागे नाहीत.  मानधनात या अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मोठी टक्कर देताना दिसतात. जर दाक्षिणेच्या आघाडीच्या अभिनेत्रींविषयी बोलायचे झाल्यास, या यादीत पहिलं नाव येतं ते अनुष्का शेट्टी हिचं. सध्या ती एका चित्रपटासाठी सुमारे चार कोटी रुपये मानधन घेते. 


अनेक हिट चित्रपटांमध्ये झळकली आहे अनुष्का... 
अनेक तामिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये झळकलेल्या अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेल्या अनुष्काने 2005 मध्ये रिलीज झालेल्या सुपर या चित्रपटातून डेब्यू केले होते. 34 वर्षीय अनुष्काने 'बाहुबली'शिवाय Vikramarkudu (2006), अरुंधती (2009), वेदम (2010), रुद्रमादेवी (2015) सिंघम सीरीज आणि भागमती (2018) या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

 

समांथा अक्किनेनी
दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांची सून समांथा अक्किनेनी दक्षिणेच्या टॉप अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या तिच्या 'रंगस्थलम' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. समांथा एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते. तिने Dookudu (2011), Neethaane En Ponvasantham (2012), Attarintiki Daredi (2013), Manam (2014), Kaththi (2014) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

बॉलिवूडच्या टॉप 5 हाइएस्ट पेड अॅक्ट्रेसेस...
बॉलिवूड अभिनेत्रींच्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही चकितच व्हाल. जाणून घेऊयात बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात..  

 

दीपिका पादुकोण : 15 कोटी
‘बाजीराव-मस्तानी’च्या यशानंतर दीपिका पदुकोणने तिची फिस 8 कोटींहून वाढवून आता 15 कोटी केली आहे. आता ती तिच्या आगामी चित्रपटांसाठी एवढेच मानधन घेतेय आणि निर्मातेदेखील तिला आनंदाने एवढी रक्कम देत आहेत.  

 

कंगना रनोट : 10-11 कोटी
‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ हिट झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट हिने तिच्या फिसचा आकडा वाढवला. आता ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये मानधन घेते.

 

करीना कपूर खान : 9-10 कोटी

करीनाचे आता फारसे चित्रपट रिलीज होत नसले, तरी तिची डिमांड मुळीच कमी झालेली नाही. बेबो तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी रुपये मानधन घेते.

 

प्रियांका चोप्रा : 8-9 कोटी
हॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची बॉलिवूडमध्येही डिमांड आहे. ती एका चित्रपटासाठी 8 ते 9 कोटी रुपये मानधन घेते.

 

कतरिना कैफ : 9 कोटी
फ्लॉप आणि कमी चित्रपट करुनदेखील कतरिना निर्माते-दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे. ती एका चित्रपसाठी 9 कोटी रुपये फिस आकारते. 

 

(नोट : सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर घेण्यात आले आहेत.)

बातम्या आणखी आहेत...