आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाव बदलून गौरीच्या घरात शिरला होता शाहरुख, लग्नापूर्वी सासूने दिली होती आत्महत्येची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता शाहरुख खानचे नाव घेताच त्याची रोमँटिक इमेज आपल्या डोळ्यांसमोर तरळते. बॉलिवूड चित्रपटांमध्ये राहुल या नावाने प्रसिद्ध असेलला हा हॅण्डसम खासगी आयुष्यातसुद्धा तितकाच रोमँटिक आहे. गेल्या 25 वर्षांपासून शाहरुख गौरीसोबत गुण्यागोविंदाने संसार करतोय. आर्यन, सुहान आणि अबराम ही त्यांच्या संसारवेलीवर उमलेली तीन फुलं आहेत.

 

25 ऑक्टोबर 1991 रोजी शाहरुख आणि गौरी लग्नाच्या बेडीत अडकले. पण या लव्ह स्टोरीतही अनेक ट्वीस्ट अँड टर्न आले होते. आज जेव्हा शाहरुख जुन्या आठवणींना उजाळा देतो, तेव्हा त्याच्या चेह-यावर हसू उमलते. भास्कर ग्रुपसोबत बोलताना स्वतः शाहरुखने प्रेमाशिवाय मी जगूच शकत नाही, असे सांगितले. व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत शाहरुखने त्याच्या लव्ह स्टोरीविषयी काय काय सांगितले, हे आम्ही वाचकांना सांगत आहोत. 

 

शाहरुख-गौरीच्या पहिल्या भेटीचा किस्सा... 

शाहरुख खान आणि गौरीची भेट शालेय जीवनात एका पार्टीत झाली होती. त्या पार्टीत शाहरुखने गौरीला एका मुलासोबत डान्स करताना पाहिले होते. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. शाहरुखचे लव्ह अॅट फस्ट साइट होते. शाहरुख-गौरीची पहिली भेट झाली तेव्हा तो 19 वर्षांचा तर गौरी 14 वर्षांची होती. शाहरुखने पार्टीत गौरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गौरीने त्याच्यासोबत बोलणे टाळले. 25 ऑक्टोबर 1984 रोजी झालेल्या तिस-या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळवला. सुरुवातीला गौरीला इम्प्रेस करण्यासाठी शाहरुख तिच्यासाठी गाणे म्हणायचा. त्या गाण्याचे बोल होते, "गोरी तेरा गांव बड़ा प्यारा मैं तो गया मारा....". किंग ऑफ रोमान्सने हार न मानता गौरीला आपल्या प्रेमात पाडले आणि त्यांचे अफेअर सुरु झाले.

 

पुढे वाचा,

* कोडवर्डमध्ये सुरु झाले होते बोलणे... 

* नाव बदलून गौरीच्या घरात शिरला होता शाहरुख... 

* अफेअरविषयी कळल्यानंतर गौरीच्या आईने दिली होती आत्महत्येची धमकी...

* शाहरुखने हळूहळू गौरीच्या घरच्यांचे मन जिंकले...

* गौरीने दिला होता शाहरुखला इशारा...

*  गौरीला शोधून आणण्यासाठी आईने दिले होते शाहरुखला 10 हजार रुपये... यासह बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...