आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, यशाच्या पायरीवर आता कुठे आहेत एकाच वर्षी डेब्यू करणारे हे 10 अॅक्टर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता वरुण धवन आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 24 एप्रिल 1987 रोजी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्या घरी वरुणचा जन्म झाला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात असिस्टंट डायरेक्टरच्या रुपात केली. 2012 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे हीरोच्या रुपात तो मोठ्या पडद्यावर अवतरला. गेल्या सहा वर्षांत वरुणने 10 बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केला असून आत्तापर्यंत त्याच्या फक्त अलीकडेच रिलीज झालेल्या 'ऑक्टोबर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वसाधारण व्यवसाय केला. एकंदरीतच काय तर त्या अभिनेत्यांच्या यादीत वरुण टॉपवर आहे, ज्यांनी वरुणसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 


वरुणच्या बरोबरीत आहे आलिया...
वरुणसोबतच 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणारी आलिया सक्सेसमध्ये लकी आहे. वरुण प्रमाणेच आलियाचा एक चित्रपट वगळला असता तिचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. आलियाने आत्तापर्यंत 10 सिनेमांमध्ये काम केले, मात्र त्यापैकी तिचा एक सिनेमा फ्लॉप (शानदार, 2014) फ्लॉप ठरला. 


स्टुडंट ऑफ द ईयर (2012), हाईवे (2014), 2 स्टेट्स (2014), हंप्टी शर्मा की दुल्हनियां (2014) कपूर अँड सन्स (2016), उडता पंजाब (2016), डिअर जिंदगी (2016), बद्रिनाथ की दुल्हनिया (2017) हे आलियाचे हिट सिनेमे आहेत. तर अग्ली, ऐ दिल है मुश्किल आणि वेलकम टू न्यूयॉर्क या चित्रपटांमध्ये आलियाने कॅमिओ केला आहे. 

 

वरुणचे हिट सिनेमे...
स्टुंडंट ऑफ द ईयर (2012), मैं तेरा हीरो (2014), हंप्टी शर्मा की दुल्हनियां (2014), बदलापुर (2015), एबीसीडी-2 (2015), दिलवाले (2015), ढिश्यूम (2016), बद्रिनाथ की दुल्हनिया (2017), जुडवा 2 (2017) हे वरुणचे हिट सिनेमे आहेत.

 

वरुणचे आगामी सिनेमे...

तर सुई धागा, कलंक आणि नबाबजादे हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. 'सुई धागा' या सिनेमात वरुण अनुष्का शर्मासोबत झळकणार आहे. तर अलीकडेच त्याने आगामी 'कलंक' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.  

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी अशा काही स्टार्सविषयी ज्यांनी वरुणप्रमाणेच सहा वर्षांपूर्वी आपले करिअर सुरु केले, मात्र त्यापैकी काही जण हिट ठर काहींना फ्लॉपचा सामना करावा लागला...   

बातम्या आणखी आहेत...