आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cricketer Virat Kohli And Actress Anushka Sharma Get A Special Token Of Love Ahead Of Valentines Day

'व्हॅलेंटाइन डे' निमित्त विराट-अनुष्काला यांनी दिलं हे खास गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अनुष्का-विराटची जोडी ही तरुणांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. दोघांविषयीही चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. दोघांच्या अफेअरच्या चर्चा आल्यापासून तर लग्नापर्यंत दोघांबद्दलच्या प्रत्येक बातमीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय. सध्या तर व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. यामुळे 'विरुष्का' ची चर्चा तर होणारच. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णाधर विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली होती. 

 

मिळाले हे अनोखे गिफ्ट़
'विरुष्का' ला व्हॅलेंटाइन डे निमित्त एक खास गिफ्ट मिळालं आहे. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार अनुष्काचे वडील कर्नल (निवृत्त) अजय कुमार शर्मा आणि आई आशिमा शर्मा शनिवारी एका पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी तेजस्विनी दिव्या नाईक या नवोदित लेखिकेच्या पुस्तकाची प्रत त्यांनी घेतली. आपली मुलगी अनुष्का आणि जावई विराटसाठी त्यांनी हे प्रेमकवितांचं पुस्तक घेतलं आहे, ते विरुष्काला भेट स्वरुपात हे पुस्तक देणार आहेत. तेव्हा आता विरुष्काला ही खास आणि प्रेमाची भेट आवडते की नाही हे पाहणं महत्त्वाच ठरेल. 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या निमित्ताने सध्या सर्वत्र प्रेमाचे वारे वाहत आहेत. त्यातच अनुष्का आणि विराटमध्ये असणाऱ्या नात्याविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. पण, प्रेमाच्या या संपूर्ण वातावरणात ही भेट त्या दोघांसाठीही खास ठरेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'विरुष्का'चे काही खास फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...