आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईः दीर्घकाळापासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर 'पद्मावत' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाने हिरवी झेंडी दाखवली आहे. येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात हा चित्रपट रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी सेन्सॉरने या चित्रपटात पाच महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. तसे पाहता, एखाद्या चित्रपटातून काही सीन्स वगळण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अनेक चित्रपटांना याचा फटका बसलेला आहे. काही चित्रपटांमधून सेन्सॉरने सीन्स हटवले तर काही चित्रपटच विविध ठिकाणी बॅन करण्यात आले. अशाच काही चित्रपटांवर एक नजर टाकुयात.
'क्वीन'च्या एका सीनमध्ये ब्लर केली ब्रा
दिग्दर्शक विकास बहलच्या 'क्वीन'मधील एका सीनमध्ये कंगनाच्या हातात ब्रा दिसते. पण सेन्सॉर बोर्डाने या सीनमध्ये ब्रा ब्लर करण्यास सांगितले. त्याशिवाय अंडरगार्मेंट्स असलेले इतर काही सीन्सदेखील ब्लर करण्यात आले होते.
'ऐ दिल है मुश्किल'मधून वगळण्यात आले होते 3 सीन्स
दिग्दर्शक करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने U/A सर्टिफिकेट दिले. मात्र यासाठी चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या 3 इंटीमेट सीन्सवर कात्री चालवण्यात आली होती.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर चित्रपटांतील अशा बदल केलेल्या सीन्सबाबत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.