Home »Gossip» Inside Photos Of Johnny Levers Dream House

फक्त 7वी शिकले आहेत जॉनी लिव्हर, मुंबईत बनवला सुंदर आशियाना, बघा Inside Photos

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2018, 15:18 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक विनोदवीर आहेत, मात्र जॉनी लिव्हर यांची बातच न्यारी आहे. आंध्रप्रदेशातील एका तेलगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. ते फक्त सातवी पर्यंत शिकलेले आहेत. पत्नी सुजाता, मुलगी जिमी आणि मुलगा जैसी असे त्यांचे कुटुंब मुंबईतील अंधेरी (वेस्ट) येथे 3BHK अपार्टमेंटमध्ये राहातात. जॉनी लिव्हर यांनी 1990 मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता.

- अशी माहिती आहे की मुंबईत जॉनी यांची आणखी घरे आहेत, मात्र या घरासोबत त्यांचे भावनिक नाते जुळले आहे. 1990 मध्ये त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता.
- divyamarathi.com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये जॉनी यांची मुलगी जिमीने सांगेतिले, 'पप्पांनी हे घर 90s मध्ये स्वतःच्या पैशाने खरेदी केले होते. या घरासोबत त्यांच्या अनेक आठवणी आहे. त्यामुळे हे घर सोडून ते दुसरीकेड जाण्यास तयार होत नाही. माझ्या भावाचा जन्म झाल्याबरोबर आम्ही येथे शिफ्ट झाला होतो. आमचे कुटुंब फार मोठे होते, आम्ही सर्वजण येथे राहात होतो. आता सर्वजण आपापल्या घरांमध्ये शिफ्ट झाले आहेत, मात्र पप्पांसाठी हे घर नेहमीच खास राहिले आहे.'

जिमीने भारतीय चित्रपट रसिकांच्या घरात घर करुन राहिलेल्या जॉनी लिव्हरच्या घराचे काही खास फोटोज् आमच्यासोबत शेअर केले, पुढील स्लाइडमध्ये पाहा Exclusive Photos

Next Article

Recommended