आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार कोटींचे मालक आहेत \'आदिरा\'चे वडील, बघा त्यांच्या यशराज स्टुडिओचे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची लाडकी आदिरा हिचा आज दुसरा वाढदिवस आहे. 9 डिसेंबर 2015 रोजी मुंबईतील ब्रीच कँण्डी रुग्णालयात राणीने आदिराला जन्म दिला होता. आदित्य आणि राणी यांनी त्यांच्या नावातील अक्षरे घेऊन आपल्या मुलीचे 'आदिरा' असे नामकरण केले आहे. 


यशराज स्टुडिओचा पाया रोवणारे दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांची आदिरा नात आहे. आदिराच्या रुपात यशराज स्टुडिओला वारस लाभला आहे. यश चोप्रा यांच्या निधनानंतर आदिराचे वडील अर्थातच आदित्य चोप्रा हे यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आहेत. आदित्य हे तब्बल तीन हजार कोटींचे मालक आहेत.  


20 एकर परिसरात आहे यशराज स्टुडिओ...
दिवंगत यश चोप्रा यांनी पाया रोवलेल्या यशराज स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. वीस एकर परिसरात हा स्टुडिओ पसरला आहे. मुंबईतील वीरा देसाई रोड (अंधेरी) वर हा स्टुडिओ उभा आहे. अनेक सिनेमा, शोजची निर्मिती या स्टुडिओत झाली आहे. 


स्टुडिओमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत...
यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग स्टेज, म्यूझिक, डबिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनसारख्या अनेक सुविधा आहेत. शिवाय येथे रिहर्सल हॉल, फिल्म मिक्स थिएटर, डायनिंग एरिया आणि जिमसारख्या सुविधासुध्दा आहेत. एडीटींग, डबिंग, मिक्सींग अशा तांत्रिक गोष्टींपासून ते कलाकारांच्या राहण्याची उत्तम सोय या स्टुडिओत आहे.


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यशराज स्टुडिओची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टुडिओचे निवडक इनसाइड फोटो...


सर्व फोटो YRF स्टूडिओच्या ऑफशिअल वेबसाइटवरून साभार घेण्यात आले आहेत...

बातम्या आणखी आहेत...