आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inside Photos Of Yash Raj Studio तीन हजार कोटींचे मालक आहेत आदित्य चोप्रा, बघा त्यांच्या यशराज स्टुडिओचे Inside Photos

तीन हजार कोटींचे मालक आहेत आदित्य चोप्रा, बघा त्यांच्या यशराज स्टुडिओचे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 मे 1971 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लाइमलाइटपासून कायम दूर राहणा-या आदित्य यांनी 2014 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव आदिरा असे आहे. आदित्य आणि राणी यांनी त्यांच्या नावातील अक्षरे घेऊन आपल्या मुलीचे 'आदिरा' असे नामकरण केले आहे.


यशराज स्टुडिओचा पाया रोवणारे दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांचे आदित्य थोरले चिरंजीव आहेत. उदय चोप्रा हा आदित्य यांचा धाकटा भाऊ आहे.  यश चोप्रा यांच्या निधनानंतर आदित्य चोप्रा हे यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आहेत. आदित्य हे तब्बल तीन हजार कोटींचे मालक आहेत.

 

20 एकर परिसरात आहे यशराज स्टुडिओ...

दिवंगत यश चोप्रा यांनी पाया रोवलेल्या यशराज स्टुडिओमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. वीस एकर परिसरात हा स्टुडिओ पसरला आहे. मुंबईतील वीरा देसाई रोड (अंधेरी) वर हा स्टुडिओ उभा आहे. अनेक सिनेमा, शोजची निर्मिती या स्टुडिओत झाली आहे.

 

स्टुडिओमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत...
यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग स्टेज, म्यूझिक, डबिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनसारख्या अनेक सुविधा आहेत. शिवाय येथे रिहर्सल हॉल, फिल्म मिक्स थिएटर, डायनिंग एरिया आणि जिमसारख्या सुविधासुध्दा आहेत. एडीटींग, डबिंग, मिक्सींग अशा तांत्रिक गोष्टींपासून ते कलाकारांच्या राहण्याची उत्तम सोय या स्टुडिओत आहे.


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यशराज स्टुडिओची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टुडिओचे निवडक इनसाइड फोटो...


सर्व फोटो YRF स्टूडिओच्या ऑफशिअल वेबसाइटवरून साभार घेण्यात आले आहेत...

 

बातम्या आणखी आहेत...