आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी तसे ब-याच जणांना ठाऊक आहे. मात्र त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी त्याच्या चाहत्यांना ठाऊक नाहीयेत. याचे एक उदाहरण म्हणजे, सलमान खान वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आईच्या हातचा मार खातो.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमानच्या आयुष्याशी निगडीत अशाच कही रंजक बाबी सांगत आहोत, ज्या त्याने एकदा मुलाखतीत सांगितल्या होत्या.
आजही खातो आईचा मार-
सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते, ''बालपणी मी जितका साधा-भोळा होतो, माझे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल तितकेच खोडकर होते. त्यामुळे आमच्यात काही मस्ती झाली तर त्या भांडणात शेवटी मीच पकडला जात होतो. कारण हे दोघे मम्मी-पापा येण्यापूर्वी धूम ठोकत होते. त्यानंतर माझी चांगलीच धुलाई व्हायची, मम्मी मारायची. आईच्या मारामुळे जास्त फरक नव्हता पडत परंतु वालिद साहेबांचा राग मनाला खूप लागत होता. त्यामुळेच आईचा मार खाल्ला तरी आमचा खोडकरपणा कधीच कमी झाला नाही.''
''एकेदिवशी आम्ही मस्ती करताना सोहेलला दुखापत झाली आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. हे पाहून मी आणि अरबाज खूप घाबरलो. जितकी भिती सोहेलला लागलेल्या जखमेची नव्हती, तितकी जास्त भिती आईच्या माराची होती. एकीकडे माझी आणि अरबाजची घाबरगुंडी उडाली होती, तर दुसरीकडे मात्र सोहेलने शक्कल लढवून सांगितले, की खेळता-खेळता त्याला ही जखम झाली. तेव्हा आम्ही वाचलो.''
''आजसुध्दा आईचा तो मार आठवला तर भिती वाटते. असे नाही, की आज आम्ही मोठे झालो म्हणजे, आईने मारणे बंद केले आहे. आजसुध्दा जर आम्ही चुकीचे वागलो तर तिच्याकडून थोबाडीत मिळते. परंतु आईचा मार तेव्हाही चांगला वाटत होता आणि आजही वाटतो.''
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, का घड्याळच गिफ्ट म्हणून देतो सलमान आणि यासह आणखी काही रंजक बाबी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.