आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुन यांनी स्वतः केले होते कबूल, श्रीदेवीसोबत केले होते गुपचुप लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटन्मेंड डेस्क : बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सच्या नावाने प्रसिध्द असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती 68 वर्षांचे झाले आहे. 16 जून, 1950 ला कोलकातामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. हे नाव त्यांनी कधीच चित्रपटांसाठी वापरले नाही. मिथुन यांचे नाव त्यांच्या को-स्टार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि इतर अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतू त्यांच्या श्रीदेवीसोबतच्या अफेअरची चर्चा सर्वात जास्त रंगली. 1984 मध्ये 'जाग उठा इंसान' मध्ये श्रीदेवी आणि मिथुन यांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मिथुन चक्रवर्तीने एका मुलाखतीत स्वतः कबूल केले होते की, त्यांनी श्रीदेवीसोबत गुपचुप लग्न केले होते.

 

योगिताला माहिती होते मिथुन-श्रीदेवीचे लग्न
- मिथुन यांची बायको योगिता बालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांनाही मिथुन-श्रीदेवीच्या लग्नाची माहिती होती.
- एका न्यूजपेपरने दोघांच्या लग्नाचे सर्टिफिकेट छापले होते.
- परंतू दोघांचे नाते जास्त दिवस टिकले नाही. यामागे मिथुनची बायको योगिता या होत्या. योगिता यांनी मिथुन यांना धमकी दिली होती की,  श्रीदेवीसोबत संबंध ठेवले ती त्या आत्महत्या करतील.
- मिथुन यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.

 

350 चित्रपटांमध्ये केले काम
मिथुन बॉलिवूडमधील अशा व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांना कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नव्हते. इंडस्ट्रीमध्ये त्यांचे कोणतेही गॉड फादर नाही. त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली. कोलकाताच्या प्रसिध्द स्कॉटिश चर्च कॉलेजमधून मिथुन यांनी केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्यूएशन केले. चित्रपटात येण्यासाठी त्यांना पुणे फिल्म संस्थानमधून अॅक्टिंगचा कोर्स केला. आतापर्यंत त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे आणि आताही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी 'वारदात', 'अविनाश', 'जाल', 'डिस्को डांसर', 'भ्रष्टाचार', 'घर एक मंदिर', 'वतन के रखवाले', 'हमसे बढ़कर कौन', 'चरणों की सौगंध', 'हमसे है जमाना', 'बॉक्सर', 'बाजी', 'कसम पैदा करने वाले की', 'प्यार झुकता नहीं', 'करिश्मा कुदरत का', 'स्वर्ग से सुंदर' सारख्या चित्रपटात काम केले आहे. 1993 ते 1998 हा त्यांचा सर्वात वाईट काळ होता. तेव्हा त्यांचे चित्रपट एकामागोमाग फ्लॉप होत होते. या काळात त्यांचे लागोपाठ 33 चित्रपट फ्लॉप ठरले होते. तरीही त्यांचे स्टारडम टिकून होते. त्यावेळी त्यांना 12 चित्रपट साइन केले होते.

 

नक्षली ते सिनेमाचा प्रवास
खुप कमी लोकांना माहिती असेल की, मिथुन चित्रपट उद्योगात प्रवेश करण्यापुर्वी कट्टर नक्षली होते. कौटूंबिक अडचणींमुळे त्यांनी आपला रस्ता बदलला आणि आपल्या कुटूंबामध्ये परत आले. एका अपघातात त्यांच्या एकुलत्या भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुन यांनी स्वतःला नक्षली आंदोलनापासून दूर केले. त्यांनी चित्रपट करिअरची सुरुवात 1976 मध्ये आलेल्या 'मृगया' चित्रपटातून केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोकृष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...