आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचे तीन चित्रपट अजूनही झाले नाही रिलीज, जाणुन घ्या असेच 25 फॅक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हार्ट अटॅकने निधन झाले. श्रीदेवीने 2017 मध्ये बॉलिवूडमध्ये 50 वर्ष पुर्ण केले होते. श्रीदेवीचे मोठे फॅन असलेले संदीप मालानी यांनी  divyamarathi.com साठी आरजे आलोक यांच्‍याशी विशेष बातचीत केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी श्रीदेवीच्‍या आयुष्‍याशी संबंधित अनेक गोष्‍टी शेअर केल्‍या होत्‍या. टाकुयात त्‍यांच्‍यावर एक नजर... 

 

- तीन दशक एकाच वेळी तीन-तीन फिल्म इंडस्ट्रीमध्ये नंबर वन असणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. 70,80 आणि 90 च्या दशकापर्यंत श्रीदेवीने तामिळ, तेलुगु आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये नंबर वन पोजिशन कायम ठेवली. मल्याळम चित्रपट सृष्टीत 1977 मध्ये श्रीदेवी नंबर 1 वर होती. यानंतर एका दिर्घ ब्रेकनंतर श्रीदेवीने 'इंग्लिश-विंग्लिश' चित्रपटातून पदार्पण केले. यामध्ये तिने उत्तम भूमिका साकारली. 'मॉम' हा श्रीदेवीचा शेवटचा सिनेमा होता.
- श्रीदेवी तिच्या काळातील अशी एकमेव अभिनेत्री होती, जिची फिस 1 कोटींपेक्षा जास्त होती.
- श्रीदेवीचे तीन चित्रपट अजूनही रिलीज झालेले नाही. त्यांमध्ये विनोद खन्ना आणि ऋषि कपूरसोबत 'गर्जना' हे चित्रपट तयार आहे. तर विनोद खन्ना, संजय दत्त, रजनीकांत आणि माधुरी दीक्षितसोबत 'जमीन' चित्रपटाची अर्धी शूटिंग झाली होती. अमिताभ बच्चन, कमल हासन आणि जया प्रदासोबत 'खबरदार' हे चित्रपट रिलीज झाले नाही.
- श्रीदेवीने 'सदमा' (1983), 'चांदनी' (1989), 'गर्जना' (1991), 'क्षणा क्षणम' (तेलुगु 1991) चित्रपटांमध्ये गाणेही गायले होते.
- अनेक लोकांना वाटते की, 'जूली' हा श्रीदेवीचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने लक्ष्मीच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. परंतू तिचा पहिला चित्रपट हा 'रानी मेरा नाम' हा होता. या चित्रपटात श्रीदेवीने हिरोइनच्या बालपणीची भूमिका साकारली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच 20 माहिती नसलेल्या गोष्टी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...