आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरफान खानपासून उर्मिला मातोंडकरपर्यंत, या 16 सेलिब्रिटींनी थाटले दुस-या धर्मात लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मीडियात सध्या अभिनेता इरफान खानला मेंदूचा कर्करोग झाल्याचे वृत्त वा-यासारखे पसरले आहे. पण इरफानचे जवळचे मित्र आणि ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगितले आहे. नाहटा यांनी सांगितल्यानुसार, "इरफान अस्वस्थ आहे. पण मीडियात त्याच्या तब्येतीविषयी येणारे वृत्त हे बेसलेस आहे." इरफान गंभीर अभिनयासाठी ओळखला जातो. पण खासगी आयुष्यात मात्र तो अतिशय रोमँटिक स्वभावाचा आहे. इरफानचे लग्न सुतापा यांच्यासोबत झाले असून त्यांची लव्ह स्टोरी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिकत असताना सुरु झाली होती. सुतापा बंगाली तर इरफान मुस्लिम आहे. असे म्हटले जाते, की सुतापासोबत लग्न करण्यासाठी इरफान हिंदु धर्म स्वीकारण्यास तयार झाला होता.


अशी सुरु झाली होती लव्ह स्टोरी... 
- अभिनयाचे बारकावे शिकत असताना कधी इरफान सुतापाच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळाले नाही. दोघांनी लिव्ह-इन-रिलेशनशिमध्ये राहायला सुरुवात केली होती. 
- लग्न न करता एकत्र राहत असलेल्या इरफान-सुतापाच्या आयुष्यात जेव्हा तिस-या व्यक्ती येणार असल्याचे कळातच त्यांनी एक खोलीचे घर सोडून दोन खोल्यांचे घर शोधले. 
- घर शोधण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विचारले जात होते, 'तुम्ही विवाहित आहात का?' यावर नाही उत्तर ऐकल्यानंतर घर दिले जात नव्हते. त्यानंतर दोघांनी 1995 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.
- इरफानने सुतापाला म्हटले होते, की जर तुझ्या कुटुंबीयांची इच्छा असेल तर मी हिंदु धर्म स्वीकारण्यास तयार आहे. परंतु याची गरज पडली नाही. कारण सुतापाच्या घरच्यांनी त्याला तसेच स्वीकारले.
- इरफान एका मुलाखतीत म्हणाला होता, की त्याची पत्नी त्याचे काम बारकाईने पाहते. सुतापा नसती तर माझ्याकडे ना हॉलिवूडचे सिनेमे असते ना स्वत:चे घर.
- सुतापाने एका मुलाखतीत सांगितले होते, की पडद्यावर गंभीर आणि कामाशी काम ठेवणारा इरफान ख-या आयुष्यात खूप विनोदी अंदाजाचा आहे. सोबतच तो त्याची मुले अयान आणि बाबिलसाठी 'जगातील सर्वश्रेष्ठ' वडील आहे. तो आपल्या मुलांच्या विचारांना समजून घेण्यासोबतच त्यांच्या संगोपनावरसुध्दा लक्ष देतो. 
- इरफान म्हणतो, 'जेव्हा माझ्याकडे काम नव्हते, तेव्हा सुतापाने घर चालवले. मी जे काही आहे, ते सुतापामुळेच आहे.'
- 23 फेब्रुवारी 1995 रोजी सुतापा सिकंदरसोबत इमरानचे लग्न झाले होते. सुतापा एक लेखिका आणि निर्माती आहे. 
- सुतापा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये इमरानच्या क्लासमेट होत्या. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. 


दुस-या धर्मातील तरुणीसोबत लग्न थाटणारा इरफान एकमेव अभिनेता नाही. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी दुस-या धर्मातील व्यक्तीची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. आता हेच बघा ना, मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरने तिच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान असलेल्या मुस्लिम काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तर मीरसोबत 3 मार्च 2016 मध्ये लग्न केले. महाराष्ट्रीयन हिंदू उर्मिलाचे लग्न हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने झाले. मोहसिन हा काश्मिरी बिझनेस फॅमिलीतून आहे.  


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दुस-या धर्मात लग्न थाटणा-या सेलिब्रिटींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...