आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju च्या यशाने आनंदी नाही संजय दत्तची मुलगी त्रिशाला, सोशल मीडियावर दिली नाही रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या संजू या चित्रपटाच्या यशाने सगळेच आनंदी आहेत, पण संजय दत्तच्या जवळची एक व्यक्ती मात्र यामुळे नाखूश दिसतेय. आम्ही बोलतोय ते संजयची थोरली मुलगी त्रिशाला दत्त हिच्याविषयी. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. पण त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा आणि मुलगी त्रिशालाचा चित्रपटात उल्लेख नाही. त्यामुळेच त्रिशाला तिच्या वडिलांवर नाराज असल्याचे सूत्रांकडून समजते. त्रिशाला सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असते. पण वडिलांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट रिलीज झाल्यापासून तिने सोशल मीडियावर

चित्रपटाविषयी एकही प्रतिक्रिया दिली नाही. 

 

रिपोर्ट्सनुसार, त्रिशाला चित्रपटातील स्टारकास्टच्या नावांचा उलगडा झाल्यापासूनच संजय दत्तवर नाराज आहे. स्टारकास्टमध्ये त्रिशाला आणि तिच्या आईची भूमिका वठवणा-या अभिनेत्रींंच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला होता. चित्रपटातही दोघींच्या नावाचा कुठेच उल्लेख आढळत नाही. 

 

संजय दत्तने केले तीनदा लग्न...
संजय दत्तचे पहिले लग्न ऋचा शर्मासोबत (1987) झाले होते. पण 1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे तिचे निधन झआले. त्यानंतर  संजयने रिया पिल्लईसोबत दुसरे लग्न. पण फार काळ हे लग्न टिकले नाही. 1998 मध्ये दोघांचे लग्न  आणि 2005 मध्ये घटस्फोट झाला. रियापासून विभक्त झाल्यानंतर संजयने 2008 मध्ये मान्यतासोबत तिसरे लग्न केले. या दोघांना शाहरान आणि इकरा ही जुळी मुले आहेत. 


फॅशन वर्ल्डमध्ये नशीब आजमावत आहे त्रिशाला...
त्रिशालाने 2014मध्ये तिचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ड्रीम ट्रेसेज हेयर एक्सटेंशन लाइन सुरु केली. तिने न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस येथून लॉमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्रिशालाचा जन्म 1988 मध्ये झाला होता. ब्रेन ट्युमरमुळे आई ऋचाचे निधन झाल्यानंतर त्रिशाला न्यूयॉर्क येथे तिच्या आजीआजोबा आणि मावशीजवळ राहते. 


त्रिशालाने फिल्म इंडस्ट्रीत येऊ नये, अशी आहे संजयची इच्छा... 
संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले होते, की त्रिशालाने कधीच फिल्म इंडस्ट्रीत येऊ नये, असे त्याचे मत आहे. त्रिशालाने दुस-या फिल्डमध्ये नाव कमवावे अशी त्याची इच्छा आहे. 

बातम्या आणखी आहेत...