आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरची नातेवाईक सोनम म्हणाली - कुटुंबीय दीपिका-रणवीरच्या लग्नाच्या प्रतिक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नासंदर्भात सोनम कपूर हिने मौन सोडले आहे. सोनम आणि रणवीरचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का... फार क्वचित लोकांना ठाऊक असावे, की सोनम रणवीरची कजिन सिस्टर आहे. रणवीर सोनमच्या आईच्या नात्यातील आहे. सोनमची आई सुनीता कपूर आणि रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी चुलत बहीणभावंडं आहेत. या नात्याने सोनम आणि रणवीर हे दोघेही बहीणभाऊ आहेत.

 

अलीकडेच सोनम लग्नाच्या बेडीत अडकली. लवकरच दीपिका आणि रणवीरदेखील लग्न करणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप दोघांच्याही कुटुंबीयांकडून याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोनमने अलीकडेच यासंदर्भात असे काही सांगितले, की ज्यावरुन या दोघांच्या लग्नाची बातमी अफवा नसल्याचे सिद्ध होते. 


काय म्हणाली सोनम..
- 14 आणि 15 मे रोजी सोनम कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. यावेळी मीडियाने सोनमला रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले असता सोनम म्हणाली, "मला आशा आहे, की हे दोघे लवकरच लग्न करतील. आमचे संपूर्ण कुटुंब रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत." सोनम हे दोघे नेमके कधी लग्न करणार आहेत, याविषयी मात्र बोलणे टाळले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, रणवीर-दीपिकाचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...