आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित असूनदेखील 17 वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत होते जॅकी श्रॉफच्या पत्नीचे अफेअर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः महाराष्ट्रातील हायप्रोफाइल कॉल डिटेल्स (सीडीआर) हेरगिरी रॅकेटमध्ये नवा खुलासा झाला आहे. यामध्ये आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे येताना दिसत आहेत. ठाणे क्राइम ब्रँच अवैध सीडीआर प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात आता अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफचे नाव समोर आले आहे. स्टाइल फेम अभिनेता साहिल खानचे अवैध पद्धतीने सीडीआर मिळवून आयशाने  वकील रिजवान सिद्दीकीला दिला असल्याचे तपासात समोर आले आहे. ठाणे क्राइम ब्रँचने 16 मार्च रोजी रिझवानला अटक केली होती. त्याच्यावर आरोप आहे की त्याने अभिनेता नवाजुद्दीनची पत्नी अंजलीचे कॉल डिटेल्स काढले होते. 57 वर्षीय आयशाचे नाव 40 वर्षीय बॉलिवूड अभिनेता साहिल खानसोबत जुळले होते.


आयशाने साहिल म्हटले होते 'गे'...
- साहिलने आयशासोबतच्या अफेअरची सार्वजनिकरित्या कबुली देऊन म्हटले होते, की आता आमचे ब्रेकअप झाले आहे. त्यामुळे आयशाने त्याला दिलेले महागडे गिफ्ट्स आणि हॉलिडेजवर केलेल्या खर्चाचे पैसे परत मागितले आहेत.
- साहिलच्या या दाव्याचे खंडन करून आयशाने त्याला 'गे' म्हटले होते. 
- साहिल एक 'समलैंगिक पुरुष आहे', त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिल्याचे आयशाने म्हटले होते.
- आयशाच्या सांगण्यानुसार, साहिलच्या पत्नीने त्याला एका व्यक्तीसोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिले होते.


आयशाने साहिलवर लावला होता फसवणुकीचा आरोप...
- आयशा आणि साहिल जुने मित्र होते.
- आयशाचा आरोप होता, की 2009 साली तिने साहिलसोबत सायबर सिक्युरिटी कंपनी आणि एक प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते.
- ही सायबर सिक्युरिटी कंपनी लवकच बंद पडली, तर प्रॉडक्शन हाऊससुद्धा तोट्यात गेले.
- आयशाने म्हटले होते, की जेव्हा तिने साहिलकडे पैशांचा हिशेब मागितला तेव्हा त्याने तो देण्यास नकार दिला होता.
- आयशाने साहिलवर 8 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला होता. 
- नोव्हेंबर 2014 मध्ये आयशाने साहिलविरोधात निनावी नंबरवरुन धमकीवजा फोन केल्याची तक्रार दाखल केली होती.


पुढील स्लाईडवर वाचा,  साहिल 'गे' असल्याने सोडले होते पत्नीने... 

 

बातम्या आणखी आहेत...